‘हिंदूंनो, चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि व्हीएचपीला द्या’, साध्वी ऋतंभरांचं आवाहन, सांगितलं असं कारण  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:38 AM2022-04-18T11:38:27+5:302022-04-18T11:40:47+5:30

Sadhvi Ritambhara News: रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजेत.

‘Hindus, give birth to four children, give two of them to RSS and VHP’, appealed Sadhvi Ritambhara | ‘हिंदूंनो, चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि व्हीएचपीला द्या’, साध्वी ऋतंभरांचं आवाहन, सांगितलं असं कारण  

‘हिंदूंनो, चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि व्हीएचपीला द्या’, साध्वी ऋतंभरांचं आवाहन, सांगितलं असं कारण  

googlenewsNext

कानपूर -  उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील निरालानगर येथील रेल्वे मैदानामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून रामोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रामाची वेशभूषा केलेली हजारो मुले सहभागी झाली होती. दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या साध्वी ऋतुंभरा यांनी हिंदूंना दोन ऐवजी किमान ४ मुले जन्माला घालण्याचं आवाहन केलं.

रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजेत. त्यामुळे ते राष्ट्रीय यज्ञामध्ये आपलं योगदान देऊ शकतील. आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोपरी असले पाहिजे.

साध्वी यांनी याबरोबरच सांगितलं की, रामोत्सवामध्ये हजारो श्रीराम स्वरूपांना वंदन झालं. या सुंदर प्रसंगी रामाचा भक्त होणे भाग्याची बाब आहे. रामभक्त बनण्यासाठी रामत्व धारण करावं लागेल. कारण राम हा अपराजित पौरुष आहे. राजकीय पक्षांनी हिंदूंची विभागणी केली. मात्र श्रीरामांचं आचरण संपूर्ण समाजाला एक करेल.

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी कथित लव्ह जेहादाच उल्लेख करताना सांगितले की, एकेकाळ सीतामातेच्या अपहरणामुळे रावणाचा नाश झाला होता. आज आम्हाला लव्ह जिहाद करणाऱ्यांना समूळ उखडून काढलं पाहिजे. केवळ रामाच्या पूजेने हे साध्य होणार नाही.  

Web Title: ‘Hindus, give birth to four children, give two of them to RSS and VHP’, appealed Sadhvi Ritambhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.