Hindu People in Kashmir: "जम्मू काश्मीरमधील हिंदूंना स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे दिली पाहिजेत"; माजी डीएसपी वैद्य यांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 07:50 PM2022-05-20T19:50:03+5:302022-05-20T19:55:07+5:30

"जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात"

Hindu People in Jammu Kashmir should be given weapons with training for self defence says former dgp sp vaidya on the situation | Hindu People in Kashmir: "जम्मू काश्मीरमधील हिंदूंना स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे दिली पाहिजेत"; माजी डीएसपी वैद्य यांचं रोखठोक विधान

Hindu People in Kashmir: "जम्मू काश्मीरमधील हिंदूंना स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे दिली पाहिजेत"; माजी डीएसपी वैद्य यांचं रोखठोक विधान

Hindu People in Kashmir : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी संघटना काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांकडून अशा हत्या दिवसेंदिवस होत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी खोऱ्यात राहणार्‍या हिंदूंसह दुर्बल घटकातील नागरिकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले पाहिजे, असा सल्ला दिला.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी आज तकशी संवाद साधताना सांगितले की, सर्वप्रथम ISI कशाप्रकारे हे हल्ले करत आहेत त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक जनता आणि पोलीस यांच्यात समन्वय असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील हिंदूंसह दुर्बल घटकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास ते स्वतःचा बचाव करू शकतील. कारण जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था करावीच लागेल, असेही ते म्हणाले.

स्वत:चे रक्षण करण्यासाठी लोकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यापूर्वी त्या संबंधी सर्व खबरदारी घ्यावी लागेल. जनते स्वसंरक्षासाठी देण्यात येणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागणार नाहीत, हेही पाहावे लागेल. या सर्व गोष्टींवर काम करून नियोजन केल्यास जनतेचे भले होईल. कारण काश्मिरींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशी काही पावले उचलणे आवश्यक आहे, असेही वैद्य यांनी विशेषकरून नमूद केले.

Web Title: Hindu People in Jammu Kashmir should be given weapons with training for self defence says former dgp sp vaidya on the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.