रणदीप सिंह सुरजेवाला होणार भाजपत सामील? या मोठ्या नेत्यानं दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 06:59 PM2021-02-12T18:59:02+5:302021-02-12T19:08:05+5:30

"सुरजेवाला यांना भाजपमध्ये बराच इंटरेस्ट आहे. तसेच ते भाजप नेत्यांचा मोठा सन्मानही करतात. सुरजेवाला यांना भाजपचे सर्वच मोठे नेते एवढ्या चांगल्या पद्धतीने आठवतात. ते त्यांच्यापासून एवढे प्रभावित आहेत. की..."

Himanta Biswa Sarma offer to Randeep Singh Surjewala to join BJP | रणदीप सिंह सुरजेवाला होणार भाजपत सामील? या मोठ्या नेत्यानं दिली ऑफर

रणदीप सिंह सुरजेवाला होणार भाजपत सामील? या मोठ्या नेत्यानं दिली ऑफर

Next
ठळक मुद्देकाँग्रेसनेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली, की भाजप आपल्या वृद्ध नेत्यांचा सन्मान करत नाही.सुरजेवाला यांना भाजपचे सर्वच मोठे नेते चांगल्या पद्धतीने आठवतात.सर्मा म्हणाले सोनोवाल यांनी सीएएला कधीही विरोध केला नाही आणि ते याच्या समर्थनार्थ सातत्याने रॅली करत आहेत.


नवी दिल्ली -काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरेजवाला (Randeep Singh Surjewala) यांना भाजपत सामील होण्याची खुली ऑफर मिळाली आहे. त्यांना भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी ही ऑफर दिली. 'सुरजेवाला यांना भाजपचे सर्वच मोठे नेते एवढ्या चांगल्या पद्धतीने आठवतात. ते त्यांच्यापासून एवढे प्रभावित आहेत. मला वाटते, की ते लवकरच आमच्यासोबत असतील,' असे हिमंत बिस्वा सर्मा यांनी म्हटले आहे. (Himanta Biswa Sarma offer to Randeep Singh Surjewala to join BJP)

झाले असे, की इंडिया टुडे आयोजित कॉन्क्लेव ईस्टमध्ये बोलताना काँग्रेसनेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली, की भाजप आपल्या वृद्ध नेत्यांचा सन्मान करत नाही. भाजपने लालकृष्ण आडवाणींपासून ते मुरली मनोहर जोशींपर्यंत अनेकांना बाजूला सारले आहे.

सुरजेवालांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना आसामचे अर्थमंत्री आणि भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा म्हणाले, "सुरजेवाला यांना भाजपमध्ये बराच रस आहे. तसेच ते भाजप नेत्यांचा मोठा सन्मानही करतात. सुरजेवाला यांना भाजपचे सर्वच मोठे नेते एवढ्या चांगल्या पद्धतीने आठवतात. ते त्यांच्यापासून एवढे प्रभावित आहेत. मला वाटते, की ते लवकरच आमच्यासोबत असतील." 

ओवेसींना भाजपनं बंगालच्या निवडणुकीत उभं केलं? अमित शाहंनी स्वतःच सांगितलं...

हिमंत बिस्वा सर्मा यांच्या वक्तव्यानंतर, सुरजेवाला यांनी पलटवार केला. ते म्हणाले, "हिमंत बिस्वा एक चांगले नेते आहेत, पण रस्ता चुकले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, की ते एक दिवस पुन्हा घरवापसी करतील." एवढेच नाही, तर सर्मा हे आसामचे मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहेत, असेही सुरजेवाला म्हणाले. यावर पलटवार करताना सर्मा म्हणाले, ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते, तेव्हा काँग्रेसला ते मंत्री बनण्या लायकही वाटले नाही. तसेच अनेक मोठ्या नेत्यांना तर त्यांचे नावही माहित नव्हते.

विधानसभा निवडणुकीचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल यावर भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा म्हणाले. ही निवडणूक पूर्वोत्तर राज्यांत भाजपचा पाय घट्ट करेल. एवढेच नाही, तर यामुळे देशभरात सुरू असलेल्या अनेक आंदोलनांवरही जनमत मिळेल.

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा 'सीएए'ला विरोध?
काँग्रेस नेते सुरजेवाला म्हणाले, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'सीएए'ला विरोध केला आहे. यावर सर्मा म्हणाले सोनोवाल यांनी सीएएला कधीही विरोध केला नाही आणि ते याच्या समर्थनार्थ सातत्याने रॅली करत आहेत.

Web Title: Himanta Biswa Sarma offer to Randeep Singh Surjewala to join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.