किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे पूल तुटला; पर्यटकांच्या गाडीवर कोसळले दगड, नऊ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 04:18 PM2021-07-25T16:18:02+5:302021-07-25T16:18:51+5:30

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडांवरून सातत्याने दगड पडत आहेत. यामुळे रेस्क्यूत अडचण येत आहे.

Himachal pradesh Landslide in Kinnaur bridge collapsed; Rocks fall on tourist vehicle, nine people killed | किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे पूल तुटला; पर्यटकांच्या गाडीवर कोसळले दगड, नऊ जणांचा मृत्यू

किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे पूल तुटला; पर्यटकांच्या गाडीवर कोसळले दगड, नऊ जणांचा मृत्यू

Next

किन्नौर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. यात गाडीवर मोठ-मोठे दगड पडून नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगण्यात येते, की हे पर्यटक दिल्ली आणि चंदिगडहून हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी आले होते. (Himachal pradesh Landslide in Kinnaur bridge collapsed; Rocks fall on tourist vehicle, nine people killed)

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडांवरून सातत्याने दगड पडत आहेत. यामुळे रेस्क्यूत अडचण येत आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. ते लवकरच पोहोचेल, असे आश्वासम मिळाले आहे. किन्नौरचे डीसी आबिद हुसैन सादिक, एसपी एसआर राणा हेही घटनास्थळी दाखल होते.

एक हजार वर्षांनंतर चीनमध्ये पुराचं भयंकर थैमान; लोक म्हणतायत- जगात कोरोना पसरवला, त्याचाच परिणाम...!

घटनास्थळी बटसेरीतील लोक पोलिसांना रेस्क्यूसाठी मदत करत आहेत. भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूलही तुटला आहे. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनासह पहाडावरून मोठ-मोठे दगड पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे

तथापि, पाऊस सुरूच असल्याने प्रशासनाने पर्यटक आणि स्थानिक लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, उपायुक्त नीरज कुमार म्हणाले, ढगफुटीमुळे खराब झालेला रस्ता पूर्ववत करण्यात येत आहे.

Web Title: Himachal pradesh Landslide in Kinnaur bridge collapsed; Rocks fall on tourist vehicle, nine people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app