पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:44 AM2021-11-24T10:44:07+5:302021-11-24T11:18:38+5:30

काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली, सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

High alert for rain in 4 states and 1 union territory for next 5 days, IMD warned | पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

Next

नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याने केरळसह 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हलका ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या (IMD) अंदाज आणि चेतावणीनुसार, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील 5 दिवसांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 27 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील यानम आणि रायलसीमा व्यतिरिक्त दक्षिण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडेल. यासोबतच हवामान खात्याने तामिळनाडूसाठी 25-26 नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

वाऱ्याचा वेग जास्त असण्याची शक्यता

26 आणि 27 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारे आणि मन्नारच्या खाडीवर तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या दरम्यान, वारा 40-60 किमी प्रतितास वेगाने वाहू शकतो. हवामान खात्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करू नये आणि त्यांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

काश्मीरमध्ये थंडीची लाट, पारा घसरला

उत्तर भारतात तापमानाचा पारा घसरायला लागला असून थंडी सतत वाढत आहे. काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली असून तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. श्रीनगरमध्ये सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे ती आतापर्यंतची सर्वात थंड रात्र ठरली. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये गेल्या काही रात्री तापमान शून्याच्या खाली नोंदवले जात असून बहुतांश ठिकाणी या हंगामातील सामान्य तापमानापेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी तापमानाची नोंद केली जात आहे. 
 

Web Title: High alert for rain in 4 states and 1 union territory for next 5 days, IMD warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.