हवाई दलाची ३ हेलिकॉप्टर घेऊन आला भंगारवाला; फोटो काढण्यासाठी शहरातील लोकांची तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:46 PM2021-06-23T12:46:41+5:302021-06-23T12:54:18+5:30

भंगारवाल्यानं खरेदी केली ६ हेलिकॉप्टर्स; फोटो काढायला शेकडो आले

helicopter bring cheers to city after scrap businessman purchased six grounded helicopter | हवाई दलाची ३ हेलिकॉप्टर घेऊन आला भंगारवाला; फोटो काढण्यासाठी शहरातील लोकांची तोबा गर्दी

हवाई दलाची ३ हेलिकॉप्टर घेऊन आला भंगारवाला; फोटो काढण्यासाठी शहरातील लोकांची तोबा गर्दी

googlenewsNext

मानसा: पंजाबच्या मानसामध्ये वास्तव्यास असलेल्या एका भंगारवाल्यानं भारतीय हवाई दलाची तीन हेलिकॉप्टर आणली आहेत. प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन असून बोलीच्या माध्यमातून भंगारवाल्यानं हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे. भंगारवाल्यानं एकूण ६ हेलिकॉप्टर खरेदी केली होती. त्यापैकी एक मुंबईतील एका व्यक्तीनं खरेदी केलं. तर दोन हेलिकॉप्टर लुधिनायातील एका हॉटेल व्यवसायिकानं खरेदी केली. आता उर्वरित तीन हेलिकॉप्टर मानसामध्ये उभी आहेत.

मानसामध्ये उभी असलेली तीन हेलिकॉप्टर सध्या स्थानिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. पंजाबमध्ये मिठ्ठू भंगारवाल्याचं नाव प्रसिद्ध आहे. भारतीय हवाई दलातील सहा जुनी हेलिकॉप्टर्स मिठ्ठू भंगारवाल्यानं खरेदी केली. यापैकी तीन हेलिकॉप्टर्स मानसामध्ये उभी आहेत. ही हेलिकॉप्टर्स पाहायला लोकांची गर्दी होत आहे. अनेक जण इथे येऊन हेलिकॉप्टरचे फोटो काढत आहेत.

मानसा शहरातील कित्येक जण येऊन हेलिकॉप्टरमध्ये बसत आहेत, त्याच्या शेजारी येऊन उभे राहत आहेत. हवाई दलाच्या सेवेत असलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची खूप कमी जणांना मिळते. त्यामुळेच हवाई दलानं वापरलेल्या, सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्यानं आनंद व्यक्त केला.

Web Title: helicopter bring cheers to city after scrap businessman purchased six grounded helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.