मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:57 PM2020-06-12T17:57:05+5:302020-06-12T18:19:51+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी पाठवणाऱ्या एका युवकाला मुंबईतून अटकही करण्यात आली होती.

UP heavy police deployment after a threat call to explode Chief Minister house | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री निवासस्थानासह 5 कालीदास मार्गाची सुरक्षा वाढवली आहे.बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास केला जात आहे.महाराष्ट्र एटीएसने, या 20 वर्षीय युवकाला नाशिकमधून अटक केली होती.

लखनौ : उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान, तसेच इतरही काही महत्वाची ठिकाने बॉम्बने उडविण्याची धमी मिळाली आहे. ही धमकी कॉल सेंटरवर देण्यात आली. यानंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलत मुख्यमंत्री निवासस्थानासह 5 कालीदास मार्गाची सुरक्षा वाढवली आहे. यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी पाठवणाऱ्या एका युवकाला अटकही करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांना धमकी देणाऱ्या कामरानला महाराष्ट्र एटीएस आणि यूपी एसटीएफने अटक केली होती.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

कामरानला अटक केल्यानंतर यूपी पोलिसांच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कला आता एक नवी धमकीचा फोन आला आहे. यात मुंबईतून अटक करण्यात आलेल्या युवकाला सोडा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, असे म्हणण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएसने, या 20 वर्षीय युवकाला नाशिकमधून अटक केली होती.

बलुचिस्तानात हिंसक आंदोलन भडकलं, पाक सैन्य शेपटी वर करून चौक्या सोडून पळालं

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामरानने 22 मेरोजी लखनौ पोलीस मुख्यालयातील सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन केला होता. यात त्याने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्ब टाकून मारू, अशी धमकी दिली होती. या धमकीच्या कॉलसंदर्भात गोमती नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

Web Title: UP heavy police deployment after a threat call to explode Chief Minister house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.