सोबत मरण्याची शपथ घेऊन दोघांनीही गळ्यात फास लटकवला, पण प्रियकराने दगाफटका केला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 08:33 PM2020-07-13T20:33:08+5:302020-07-13T20:33:44+5:30

फतेहपूर येथील प्रेमी युगुलाने एकत्र जीव देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन फाशीचे दोरही गळ्यात लटकावून घेतले.

He swore to die with her, but his lover slapped him in fatehpur disctrict | सोबत मरण्याची शपथ घेऊन दोघांनीही गळ्यात फास लटकवला, पण प्रियकराने दगाफटका केला

सोबत मरण्याची शपथ घेऊन दोघांनीही गळ्यात फास लटकवला, पण प्रियकराने दगाफटका केला

Next

सिकर जिल्ह्यातील फतेहपूर येथील एका प्रेमी युगुलाने आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेत, सोबतच जीवन जगण्याच्या आणि मरण्याच्या शपथाही घेतल्या. मात्र, आपल्या प्रेयसीला विश्वासघाताने, दगाफटक्याने मारुन प्रियकराने धूम ठोकली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. 

फतेहपूर येथील प्रेमी युगुलाने एकत्र जीव देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन फाशीचे दोरही गळ्यात लटकावून घेतले. मात्र, प्रियकारने धोका दिला अन् केवळ प्रियसीलाच जीव देण्यास भाग पाडले. त्यानंतर, प्रियकराने प्रेयसीचा मोबाईल आणि पैसे घेऊन घटनास्थळावरुन धूम ठोकली. सुरुवातीला पोलिसांना ही घटना म्हणजे आत्महत्येचं प्रकरणा वाटलं. मात्र, घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी खुलासा करुन आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजानगढ येथील मदनसिंहने बहिण मंजूर कवर हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसात खटला दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी मंजूरच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स घेऊन तपास सुरु केला. त्यावेळी, मंजूरने नागौर येथील रहिवाशी 20 वर्षीय टवर सिंहसोबत सातत्याने संवाद साधल्याचे उघडकीस आले. त्यामुळे, पोलिसांनी टवरसिंहला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांचे प्रेम प्रकरण असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

मंजू आणि टवरसिंहचे प्रेमसंबंध होते, पण मंजू सातत्याने टवरसिंहवर संशय घेत होती. टवरे इतर मुलीशीही लागेबंदे असल्याची तक्रार ती सातत्याने करत होती. त्यामुळेच टवरसिंहने तिच्याशी दगाफटका करुन तिला ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.   
 

Web Title: He swore to die with her, but his lover slapped him in fatehpur disctrict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.