Haryana Election 2019: Haryana Celebrities Casts Their Vote In State Assembly Election; Dushyant Chautalaarrive on a tractor, to cast their votes | Haryana Election 2019 : दुष्यंत चौटाला ट्रॅक्टर चालवत पोहोचले मतदान केंद्रावर, सोनाली-योगेश्वर यांनीही मतदानाचा हक्क बजावला

Haryana Election 2019 : दुष्यंत चौटाला ट्रॅक्टर चालवत पोहोचले मतदान केंद्रावर, सोनाली-योगेश्वर यांनीही मतदानाचा हक्क बजावला

चंदिगड : हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.  विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून या निवडणुकीत 1169 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 

सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.  जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी आपल्या कुटुंबीयांसह सिरसा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी दुष्यंत चौटाला हे ट्रॅक्टर चालवत मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासोबत नैना चौटाला आणि मेघना चौटाला उपस्थित होत्या.

सोनाली-योगेश्वर दत्त यांनी केले मतदान
हरयाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी सकाळी आठ वाजत हिसार येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच, टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी आदमपूरमध्ये मतदान केले. सोनाली फोगाट या आदमपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप विश्नोई रिंगणात उतरले आहेत. याशिवाय, ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्त सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. योगेश्वर दत्तला भाजपाने उमेदवारी दिली आहे. योगेश्वर दत्त याने बारौदामध्ये मतदान केले. त्याच्या विरोधात काँग्रेसचे कृष्ण हुड्डा निवडणुक लढवत आहेत.

NBT

गीता-बबिता फोगाट यांनी बजावला मतदानाचा हक्क
महिला कुस्तीपट्टू बबिता फोगाट आणि गीता फोगाट यांनी आपल्या कुटुंबीयांसह चरखी दादरी मतदारसंघात असलेल्या बलाली गावात मतदान केले. बबिता फोगाट भाजपाच्या उमेदवार आहेत. चरखी दादरी मतदारसंघातून बबिता फोगाट यांच्याविरोधात काँग्रेस नेता नृपेंद्र सिंह सांगवान आणि जेजेपीचे नेते सतपाल सांगवान निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

NBT

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Haryana Election 2019: Haryana Celebrities Casts Their Vote In State Assembly Election; Dushyant Chautalaarrive on a tractor, to cast their votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.