शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी

By बाळकृष्ण परब | Published: October 9, 2020 08:52 PM2020-10-09T20:52:54+5:302020-10-09T20:57:03+5:30

West Bengal News : या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

Harbhajan Singh erupted after insulting the turban of a Sikh soldier, demanding action | शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी

शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये एका शीख सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरलभाजपाचे नेते प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेत तैनात असलेले शीख जवान बलविंदर सिंग यांची पगडी खेचण्यात आल्याचा व्हिडीओ समोरया व्हिडीओमध्ये कोलकाता पोलीस या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहेत

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सुरक्षेत तैनात असलेल्या एका शीख जवानाला मारहाण करत त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याने क्रिकेटपटू हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एका शीख सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेत तैनात असलेले शीख जवान बलविंदर सिंग यांची पगडी खेचण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोलकाता पोलीस या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहेत. यादम्यान, सरद जवानाची पगडी सुटत असल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणाती दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र या व्हिडीओबाबत पश्चिम बंगाल पोलिसांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 



दिल्लीतील भाजपा नेते इंप्रित सिंग बख्शी यांनी ट्विट करून सांगितले की, प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या बलविंदर सिंग यांची पगडी खेचून उतरवणे आणि रस्त्यावर फरफटत नेऊन मारणे या गोष्टी पश्चिम बंगाल पोलिसांचे क्रौर्य दाखवणाऱ्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत कारवाई केली पाहिजे. याच पगडीवाल्यांनी बांगलादेशची निर्मिती केली होती. 

 

Web Title: Harbhajan Singh erupted after insulting the turban of a Sikh soldier, demanding action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.