एच-१बी व्हिसामुळे या कंपन्यांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:11 AM2020-05-26T00:11:34+5:302020-05-26T00:13:31+5:30

‘अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवे’ने एच-१बी व्हिसाच्या नियमनाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 H-1B visas will hit these companies hard | एच-१बी व्हिसामुळे या कंपन्यांना बसणार फटका

एच-१बी व्हिसामुळे या कंपन्यांना बसणार फटका

Next

नवी दिल्ली : अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सत्तेत आल्यापासून एच-१बी व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या कामगारांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातच आता कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर अमेरिकेतील आव्रजन (इमिग्रेशन) पूर्णत: बंद करण्यात आले आहे. एच-१बी व्हिसाधारकांवरही बंदी घालण्याचा विचार ट्रम्प प्रशासनाने चालविला आहे. असे झाल्यास अमेरिकेतील १० मोठ्या कंपन्यांना जबर फटका बसणार आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ‘अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवे’ने एच-१बी व्हिसाच्या नियमनाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विदेशी कामगारांच्या हंगामी कार्य अधिकारावर त्याचा थेट परिणाम होईल. अमेरिकेतील १० बड्या कंपन्यांवर एच-१बी व्हिसा बंदीचा किती परिणाम होईल याचा हा लेखाजोखा.

अ‍ॅमेझॉन
अ‍ॅमेझॉनमध्ये ७,५०,००० कर्मचारी काम करतात. त्यातील ३,५७५ कर्मचारी एच-१बी व्हिसाधारक आहेत.

अल्फाबेट (गुगल)अल्फाबेट अथवा गुगलकडे १,१८,८९९ कर्मचारी आहेत. त्यातील २,७०७ कर्मचारी एच-१बी व्हिसाधारक आहेत.

मायक्रोसॉफ्ट
कंपनीकडे १४,४०० कर्मचारी आहेत. एच-१बी व्हिसा मंजुरी १,७०६ जणांची आहे.

फेसबुक
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटकडे ४४,९४२ कर्मचारी असून १,५३४ जणांची एच-१बी व्हिसा अर्ज परवानगी आहे.

आयबीएम
२०१८ मधील आकडेवारीनुसार आयबीएमकडे ३,८१,१०० कर्मचारी असून, एच-१बी व्हिसाच्या मंजूर अर्जांची संख्या १,२५६ आहे.

अ‍ॅपल
या आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीकडे १,३७,००० कर्मचारी असून, मंजूर एच-१बी अर्जांची संख्या १,१५५ आहे.

इंटेल
१,१०,८०० कर्मचारी असलेल्या इंटेलच्या एच-१बी व्हिसाच्या मंजूर अर्जांची संख्या १,०१४ आहे.

सिस्को
सिस्कोमधील कामगार संख्या ७५,९०० असून, मंजूर एच-१बी अर्जांची संख्या ६९० आहे.

क्वालकॉम
या चिपसेट उत्पादक कंपनीची श्रमशक्ती ३७ हजार असून, मंजूर एच-१बी याचिकांची संख्या ६५२ आहे.

उबेर
अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय राईड-हेलिंग कंपनी उबेरची कर्मचारी संख्या २,६०,९०० असून, मंजूर एच-१बी व्हिसा याचिकांची संख्या ४९१ आहे.

Web Title:  H-1B visas will hit these companies hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.