बेपर्वाईबद्दल जाब विचारल्यानं डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण; ३ रुग्णांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:28 PM2021-05-02T12:28:11+5:302021-05-02T13:29:12+5:30

Doctors run and beat women : महिलेचा ऑक्सिजन मास्क डॉक्टरांनी काढून घेतल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला.

Gwalior ruckus in kamalaraja hospital doctors run and beat women during which three died | बेपर्वाईबद्दल जाब विचारल्यानं डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण; ३ रुग्णांचा जागीच मृत्यू

बेपर्वाईबद्दल जाब विचारल्यानं डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण; ३ रुग्णांचा जागीच मृत्यू

Next

 (प्रातिनिधीक फोटो)

शनिवारी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील कमलाराजा रुग्णालयात प्रचंड गदारोळ झाला. निष्काळजीपणाच्या आरोपाखाली डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. या दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यूदेखिल झाला. शनिवारी ग्वाल्हेरमधील कमलाराजा रुग्णालयात ही खळबळजनक घटना घडली. तेथे दाखल असलेल्या रूग्णांचे कुटुंबिय आणि डॉक्टर यांच्यात भांडण झाले.  त्यावेळी डॉक्टरांनी धावत जाऊन महिलांना मारहाण केली. 

CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव

या सगळ्यात रुग्णालयात दाखल झालेल्या ८० वर्षीय शकुंतला देवी यांचे निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांशी वाद घातला. यानंतर संतप्त कर्मचारी परिचारिकांनी प्रभाग सोडला. परिणामी योग्यवेळी सुविधा न मिळाल्यानं आणखी दोन रुग्णही मरण पावले. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की रुग्णाची प्रकृती आधीच गंभीर होती.

CoronaVaccine : संक्रमण होतंच मग कोरोनाची लस का घ्यायची? तज्ज्ञांनी सांगितला लस घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा

महिलेचा ऑक्सिजन मास्क डॉक्टरांनी काढून घेतल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर डॉक्टर फराज आदिल आणि इतरांनी हे आरोप फेटाळले. यानंतर, पहिल्यांदा कुटुंबाने वॉर्डमध्येमध्ये गोंधळ घातला त्यानंतर डॉक्टर निघून गेले. थोड्या वेळाने डझनाहून अधिक डॉक्टर वॉर्डात आले.

या डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. डॉक्टरांनी त्या रुग्ण महिलेलादेखील वाचवले नाही. या गोंधळामुळे आणखी तीन रुग्ण मरण पावले. डॉक्टरांनी पोलिसांशीदेखील संपर्क साधला. यानंतर सर्व डॉक्टर डीनच्या कार्यालयात पोहोचले आणि काम बंद केले. रुग्णाच्या कुटुंबियांना रुग्णालयात येण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी  डॉक्टरांकडून केली जात आहे. 

Web Title: Gwalior ruckus in kamalaraja hospital doctors run and beat women during which three died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.