ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबादमध्ये घेतली अदानींची भेट, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:12 PM2022-04-21T20:12:14+5:302022-04-21T20:12:56+5:30

अदानी समूह भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी २ लाख पौड्सच्या पाच स्कॉलरशीप देऊन ब्रिटनमध्ये मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घेण्यास मदत करणार आहे.

Gujarat UK PM Boris Johnson meets Chairman of Adani Group Gautam Adani in Ahmedabad discusses important issues | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबादमध्ये घेतली अदानींची भेट, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबादमध्ये घेतली अदानींची भेट, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

Next

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain PM Boris Johnson) यांनी गुरूवारी उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. अहमदाबादमधील शांतिग्राम येथे असलेल्या अदानी ग्लोबल हेडक्वार्टरमध्ये ही भेट झाली. या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी ब्रिनटनच्या पंतप्रधानांचं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. ब्रिटनच्या इतिहासात कोणत्याही कार्यरत असलेल्या पंतप्रधानांनी यापूर्वी गुजरातचा दौरा केला नव्हता.

अदानी समुहाच्या जागतीक मुख्यालयात बोरिस जॉन्सन आणि गौतम अदानी यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात झाली. भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणं हा यामील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी एनर्जी ट्रांझिशन, क्लायमेट अॅक्शन, एअरोस्पेस, डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि ह्युमन कॅपिटलसारख्या क्षेत्रातील विकासासह अन्य मुद्द्यांवर चर्चा केली.

यापूर्वी गौतम अदानी आणि बोरिस जॉन्सन यांची भेट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये झाली होती. यामध्ये दोघांनी क्लिन एनर्जी पोहोचवण्याच्या विषयावर करत असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली होती. अदानी समूहाचे अध्यक्ष आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यातील आजच्या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षण क्षेत्रातील सहभाग हा होता. भारताने २०३० पर्यंत सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ३०० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे आणि OEM क्षमता अधिक बळकट करून संरक्षण क्षेत्रातील निर्यात केंद्र म्हणून भारताची स्थापना करण्याचे अदानींचे उद्दिष्ट आहे.


विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप
आत्मनिर्भर भारतअंतर्गत, अदानी समूह आणि युकेच्या सुप्रसिद्ध कंपन्या एकत्रितपणे एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करण्यासाठी एकत्र काम कसे करू शकतात यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान गौतम अदानी यांनी भारतीय तरुणांसाठी शेवनिंग स्कॉलरशिपची घोषणाही केली. ही ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिपपैकी एक आहे. अदानी समूह भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी २ लाख पौड्सच्या पाच स्कॉलरशीप देऊन ब्रिटनमध्ये मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घेण्यास मदत करणार आहे. यावेळी अदानी यांनी इंडिया युके क्लायमेट सायन्स अँड टेक्नॉलॉजी समिटसाठीही बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण दिलं. ते २८ जून २०२२ पासून लंडनमध्ये सुरू होणार आहे.

Web Title: Gujarat UK PM Boris Johnson meets Chairman of Adani Group Gautam Adani in Ahmedabad discusses important issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.