संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:31 AM2020-09-07T08:31:46+5:302020-09-07T10:27:00+5:30

कंगनासोबतच्या वादादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरून गुजरात भाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे.

Gujarat BJP, Congress angry over Sanjay Raut's statement, Alpesh Thakor threatens to blacken his face | संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी

संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी

Next
ठळक मुद्देकंगनावर टीका करताना संजय राऊत यांनी गुजरातचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता राऊत यांच्या या विधानाला गुजरात भाजपासह काँग्रेसनेही घेतला जोरदार आक्षेप भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा

अहमदाबाद - सध्या शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. दोन्हींकडून एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी होत आहे. दोघांच्याही समर्थकांकडूनही एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता कंगनासोबतच्या वादादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरून गुजरातभाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे.

कंगनावर टीका करताना संजय राऊत यांनी गुजरातचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता. राऊत यांच्या या विधानाला गुजरात भाजपासह काँग्रेसनेही जोरदार आक्षेप घेतला आहे. गुजरातमधील करणी सेनेने त्यांचा पुतळा जाळला आहे. तर भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांस सिंह राजपूतच्या मृत्यवरून सध्या राजकारण पेटले आहे. दरम्यान या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची धग गुजरातपर्यंत पोहोलची आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हटल्यावर प्रतिक्रिया देताना गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ, मनीष दोषी म्हणाले की, गुजरात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांची भूमी आहे. येथे अनेक शूरवीर आणि दानवीरांनी जन्म घेतला आहे. राऊत यांचे हे विधान वैयक्तिक आहे. मात्र अशी विधाने गुजरात खपवून घेणार नाही.

दरम्यान, माजी आमदार आणि भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनीही राऊत यांच्याविरोधात आक्रम भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानच्या रूपात करून गुजरातचा अपमान केला आहे. गुजरात अशी विधाने सहन करणार नाही, असा इशारा अल्पेश ठाकून यांनी दिला आहे.

करणी सेनेनेही या विधानाविरोधात आक्रमक होत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच या विधानासाठी संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे प्रसारमाध्यम प्रवक्ते प्रशांत वाला यांनीी राऊत यांचे विधान दुर्दैवी असल्याचे सांगत माफीची मागणी केली आहे.

Web Title: Gujarat BJP, Congress angry over Sanjay Raut's statement, Alpesh Thakor threatens to blacken his face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.