1993 Bombay Serial Blasts BREAKING: मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी चौघांना अटक, गुजरात ATS ची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:30 PM2022-05-17T13:30:40+5:302022-05-17T13:38:45+5:30

Gujarat ATS arrested four accused in the 1993 Bombay serial blasts case गुजरात एटीएसने मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

Gujarat ATS arrested four accused in the 1993 Bombay serial blasts case | 1993 Bombay Serial Blasts BREAKING: मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी चौघांना अटक, गुजरात ATS ची मोठी कारवाई

1993 Bombay Serial Blasts BREAKING: मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी चौघांना अटक, गुजरात ATS ची मोठी कारवाई

Next

मुंबई-

गुजरात एटीएसनेमुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 1993 Bombay serial blasts चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांची एटीएसकडून कसून चौकशी केली जाणार आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आज चार जणांना अटक करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरकला तब्बल २९ वर्षांनी संयुक्त अरब अमिरातमधून अटक करण्यात यश मिळालं होतं. यानंतर आता गुजरात एटीएसनं आणखी चार जणांना या बॉम्बस्फोटाप्रकरणी पकडलं आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवलं होतं. देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणून मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट ओळखला जातो. यामध्ये एकूण २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. 

अबू बकर कोण? 
अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. सन १९९७ मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१९ मध्ये बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र, काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Gujarat ATS arrested four accused in the 1993 Bombay serial blasts case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.