बिहारमध्ये महाआघाडी मैदानात, तर एनडीए डिजिटल प्रचारात; कोरोनामुळे प्रचारावर मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:00 AM2020-10-21T08:00:07+5:302020-10-21T08:02:19+5:30

डिजिटल प्रचारात भाजपचा दबदबा असल्याने या क्षेत्रात त्यांनी आघाडी घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅली गावागावांत झाल्या. डिजिटल प्रचारासाठी भाजपने जवळपास १० हजार आयटीतज्ज्ञ नेमले असून ७० हजारांपेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप बनवले आहेत.

In the Grand Alliance ground in Bihar while in the NDA digital campaign | बिहारमध्ये महाआघाडी मैदानात, तर एनडीए डिजिटल प्रचारात; कोरोनामुळे प्रचारावर मर्यादा

बिहारमध्ये महाआघाडी मैदानात, तर एनडीए डिजिटल प्रचारात; कोरोनामुळे प्रचारावर मर्यादा

Next

असिफ कुरणे

पटना :बिहार निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आठवडा शिल्लक आहे, पण कोरोना महामारीमुळे प्रचारावर अनेक बंधने आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात महाआघाडी मैदानावर, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) डिजिटल प्रचारात दिसत आहे. कोरोनामुळे सर्वच पक्षांना प्रचारसभा, रोड शो व छोट्या सभा घेण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद महागठबंधनला दिलासा देणारा आहे.

डिजिटल प्रचारात भाजपचा दबदबा असल्याने या क्षेत्रात त्यांनी आघाडी घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅली गावागावांत झाल्या. डिजिटल प्रचारासाठी भाजपने जवळपास १० हजार आयटीतज्ज्ञ नेमले असून ७० हजारांपेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप बनवले आहेत. याच्या माध्यमातून मोदी, शहा, नितीशकुमार या नेत्यांसह भाषणांचे व्हिडिओ, केलेली कामे, मुद्दे पोहोचवण्याचे नियोजन आहे. बिहारमधील इंटरनेट वापरणाºयांची संख्या पाहता हे दिव्य ठरणार आहे.

सोशल मीडियाचा वापर करणार
भाजप फेसबुक पेज, युट्यूब, चॅनल टिष्ट्वटरच्या माध्यमातून आक्रमक प्रचार करते. विरोधी असलेल्या राजद, काँग्रेसचा डिजिटल प्रचार प्राथमिक अवस्थेत दिसतोय. त्यांची फेसबुक पेज, व्हर्च्युअल रॅली कमी असून राजदच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवर ३६५ हजार फॉलोअर्स आहेत, तर बिहार भाजपचे १९३ हजार, तर नितीश कुमार यांचे ६० लाख फॉलोअर्स आहेत. तेजस्वी यादव यांचे २६ लाख फॉलोअर्स आहेत.
 

Web Title: In the Grand Alliance ground in Bihar while in the NDA digital campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.