Govt Jobs: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; फक्त ग्रॅज्युएशनची अट, पगार 66 हजार

By हेमंत बावकर | Published: October 12, 2020 09:26 AM2020-10-12T09:26:06+5:302020-10-12T09:27:02+5:30

Sarkari Naukri: उच्च न्यायालयातील ही भरती प्रक्रिया मार्च 2020 मध्येच सुरु केली जाणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ती स्थगित करण्यात आली. आता 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्य़ात आली आहे. 

Govt Jobs: Golden Opportunity in Rajasthan High Court; Only graduation, salary 66000 | Govt Jobs: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; फक्त ग्रॅज्युएशनची अट, पगार 66 हजार

Govt Jobs: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; फक्त ग्रॅज्युएशनची अट, पगार 66 हजार

Next

जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुमच्यासाठी उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. राजस्थानउच्च न्यायालयात (HCRAJ) मध्ये क्लार्क आणि असिस्टंटच्या पदांवर भरती निघाली आहे. केवळ एक परिक्षा देऊन सरकारी नोकरी मिळविता येऊ शकते. यासाठी hcraj.nic.in वर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 


Rajasthan High Court Vacancy 2020: ही भरती प्रक्रिया मार्च 2020 मध्येच सुरु केली जाणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ती स्थगित करण्यात आली. आता 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्य़ात आली आहे. 

रिक्त पदे:
जूनियर ज्यूडिशियल असिस्टंट - 268 पदे
क्लार्क ग्रेड 2 - 08 पदे
जूनियर असिस्टंट - 18 पदे
क्लार्क ग्रेड 2 (डिस्ट्रिक्ट कोर्ट - नॉन टीएसपी) - 1056 पदे
क्लार्क ग्रेड 2 (डिस्ट्रिक्ट कोर्ट - टीएसपी) - 61 पदे
जूनियर असिस्टंट (नॉन टीएसपी) - 333 पदे
जूनियर असिस्टंट (टीएसपी) - 16 पदे
एकूण पदे - 1760

शैक्षणिक योग्यता काय? 
या पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. याशिवाय त्याचे वय 18 ते 40 वर्षे या वयोगटात असावे. आरक्षित वर्गासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. वय 1 जानेवारी 2021 पर्यंतचे गृहित धरले जाणार आहे. 

पे स्केल - 20,800 रुपये प्रति महिना ते 65,900 रुपये प्रति महिना


अर्ज कसा कराल? 
उच्चन्यायालयातील भरतीसाठी राजस्थान उच्चन्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : 1 ऑक्टोबर 2020
अर्ज प्रक्रियेची शेवटची मुदत : 1 नोव्हेंबर 2020 
अर्ज शुल्क अंतिम तारिख - 2 नोव्हेंबर 2020

शुल्क किती? 
जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 500 रुपये. राजस्थानच्या एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 350 रुपये. 

लिंक्स 
HCRAJ clerk notification 2020 साठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...
https://hcraj.nic.in/hcraj/recruitment_detail.php?id=MzA=&_ga=2.117746889.1300797954.1602381406-763477693.1584512576

Web Title: Govt Jobs: Golden Opportunity in Rajasthan High Court; Only graduation, salary 66000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.