पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं स्पष्ट, म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:34 AM2019-09-05T11:34:01+5:302019-09-05T11:34:40+5:30

2025 पर्यंत देशात पेट्रोल-डिझेल वाहन संपुष्टात येतील असं सांगण्यात येत होतं.

govt does not intend to ban petrol & diesel vehicles Says Nitin Gadkari | पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं स्पष्ट, म्हणाले की...

पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं स्पष्ट, म्हणाले की...

Next

नवी दिल्ली - इलेक्ट्रीक वाहन खरेदी प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणण्यात येईल अशाप्रकारच्या चर्चेला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते तसेच इंधनाची कमतरता लक्षात घेता या वाहनांची उत्पादन बंद करण्यात आली आहे. आता फक्त इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर भर द्यावा अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या. 

या बातमीवर केंद्रीय गडकरी नितीन गडकरी म्हणाले की, पेट्रोल-डिझेल गाड्यांवर मोदी सरकार कोणत्याही प्रकारची बंदी आणणार नाही. पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणावी अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाला प्राप्त झाली मात्र केंद्र सरकारचा असा कोणताही विचार नाही. आम्ही पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

2025 पर्यंत देशात पेट्रोल-डिझेल वाहन संपुष्टात येतील असं सांगण्यात येत होतं. इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे लोकांचे कल राहील. याआधीही अशा बातम्या आल्या होत्या. त्यावेळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते की, पर्यावरण वाचविण्यासाठी तसेच इंधन आयात करण्यात कपात करण्यात आली आहे. मात्र इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पेट्रोल-डिझेल वाहन बंदी करणार असं कोणत्याही सरकारी कागदपत्रात लिहिलं नाही. भारत अशा प्रकारची जोखीम उचलू शकत नाही. 
 
 

Web Title: govt does not intend to ban petrol & diesel vehicles Says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.