सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:09 PM2020-05-13T17:09:46+5:302020-05-13T17:46:17+5:30

Atmanirbhar Bharat Abhiyan गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असेल्यांनाही पीएफ काढता येणार आहे. तसेच १२ टक्के कंपनी आणि १२ टक्के कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये सरकार आणखी तीन महिने पीएफ भरणार आहे.

government will pay the PF of employee, employer share for the next three months hrb | सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ

सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असलेल्यांचा पीएफ कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग सरकार भरत होते. आता पुढील तीन महिने १२-१२ टक्के भाग सरकारच भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.


गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असेल्यांनाही पीएफ काढता येणार आहे. तसेच १२ टक्के कंपनी आणि १२ टक्के कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये सरकार आणखी तीन महिने पीएफ भरणार आहे. यासाठी ७२.२ लाख कर्मचाऱ्यांचा जून, जुलै, ऑगस्टचा पीएफ जमा केला जाणार आहे. यासाठी २५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे सीतारामन यांनी सांगितले. 




तसेच पुढील तीन महिन्यांसाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे पीएफ भाग आधी १२-१२ टक्के होता. तो आता १०-१० टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनाही हातात पैसे हवे आहेत. तसेच कंपन्यांनाही पैसे हवे आहेत. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांकडे ६५०० कोटींचे भांडवल खेळते राहील. यातून सरकारी कंपन्यांना वगळण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

Atmanirbhar Bharat Abhiyan मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

 

Read in English

Web Title: government will pay the PF of employee, employer share for the next three months hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.