सरकार-दारू माफियांचे संगनमत अलिगढ दारूकांडास जबाबदार - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:42 AM2021-06-10T06:42:38+5:302021-06-10T06:42:58+5:30

Priyanka Gandhi : अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.

Government-liquor mafia conspiracy is responsible for Aligarh liquor scandal - Priyanka Gandhi | सरकार-दारू माफियांचे संगनमत अलिगढ दारूकांडास जबाबदार - प्रियांका गांधी

सरकार-दारू माफियांचे संगनमत अलिगढ दारूकांडास जबाबदार - प्रियांका गांधी

Next

नवी दिल्ली :अलिगढ दारूकांडाला योगी आदित्यनाथ सरकार आणि दारू माफियांदरम्यानचे संगनमत जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी केला आहे.
अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.
फेसबुकवरील पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, सरकार आणि दारू माफियांच्या संगनमतामुळे अलिगढमध्ये ही शोकांतिका घडली. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन आणि औषधी उपलब्ध होत नव्हती. कामधंदे बंद होते. परंतु, प्रशासन आणि दारू माफियांच्या साटेलोट्यामुळे राज्यांत व्यवसायाची भरभराट होत होती.
उत्तर प्रदेश काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी या भीषण घटनेविरुद्ध आवाज उठवून या घटनेस जबाबदार असलेल्या सरकारमध्ये बसलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
दरम्यान, त्यांनी आग्रा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मॉक ड्रीलदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला केला. या प्रकरणाचे तथ्य समोर आणून सरकार दोषींना शिक्षा करणार का? असा सवाल त्यांनी ट्विटवर केला आहे

Web Title: Government-liquor mafia conspiracy is responsible for Aligarh liquor scandal - Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.