Government Jobs: केंद्र सरकारला हवेत 12 वी पास; क्लार्क, डाटा एन्ट्रीसाठी मोठी भरती

By हेमंत बावकर | Published: November 7, 2020 05:24 PM2020-11-07T17:24:44+5:302020-11-07T17:34:31+5:30

Government Jobs: 12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Government Jobs: Central Government need 12th pass; Recruitment for Data Entry, Clark | Government Jobs: केंद्र सरकारला हवेत 12 वी पास; क्लार्क, डाटा एन्ट्रीसाठी मोठी भरती

Government Jobs: केंद्र सरकारला हवेत 12 वी पास; क्लार्क, डाटा एन्ट्रीसाठी मोठी भरती

googlenewsNext

12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. SSC Vacancy 2020


या पदांवर भरती 
SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. 
लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
 पोस्टल असिस्टंट
डाटा एंट्री ऑपरेटर्स

कोण अर्ज करू शकतात?
देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले युवक या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली जात आहे. 


शुल्क
महिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 


महत्वाच्या तारखा...
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 6 नोव्हेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख - 17 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑफलाईन चलन अंतिम तारीख - 19 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर

परिक्षा
कॉम्प्युटरवरील परिक्षा 1 - 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021
परिक्षा दुसरी - नंतर घोषित केली जाईल. 


वयाची अट 
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी 15 वर्षांची सूट दिली जाईल. ती 27+15 अशी असेल. 

डायरेक्ट लिंक 
SSC CHSL Exam Notification 2020 साठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

 

 

Web Title: Government Jobs: Central Government need 12th pass; Recruitment for Data Entry, Clark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.