अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतलं GoAirचं विमान, बँकॉकसाठी केलं होतं उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 08:16 PM2019-08-16T20:16:38+5:302019-08-16T20:17:01+5:30

गो एअर या कंपनीच्या विमानाला अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतावं लागलं.

goair a320 neo delhi bangkok flight aircraft grounded | अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतलं GoAirचं विमान, बँकॉकसाठी केलं होतं उड्डाण

अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतलं GoAirचं विमान, बँकॉकसाठी केलं होतं उड्डाण

Next

नवी दिल्लीः गो एअर या कंपनीच्या विमानाला अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतावं लागलं. गो एअरच्या ए320नं दिल्ली-बँकॉक विमानानं उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच त्याला माघारी परतावं लागलं आहे. या विमानाचं पुन्हा दिल्लीत लँडिंग करण्यात आलं आहे. विमानानं उड्डाण केल्यानंतर त्यात काही तांत्रिक दोष असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं आणि वैमानिकानं लागलीच ते विमान परत दिल्लीत विमानतळावर उतरवलं.
 
गोएअरच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा गोएअरच्या विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे. जून 2019मध्येही गोएअरच्या विमानाचं औरंगाबाद विमानतळावर तात्काळ लँडिंग करण्यात आलं होतं. गोएअरचं जी-8 586 विमान पाटणाहून मुंबईला येत होतं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं ते तात्काळ औरंगाबाद विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. त्या विमानात तेव्हा 158 प्रवासी होती. त्यांना दुसऱ्या व विमानानं मुंबईला पाठवण्यात आलं होतं. 

Web Title: goair a320 neo delhi bangkok flight aircraft grounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GoAirगो-एअर