हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:05 IST2025-12-09T18:04:22+5:302025-12-09T18:05:36+5:30
अभिषेक नावाचा तरुण नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला, पण नंतर त्याच्यासोबत आक्रित घडलं .

हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक नावाचा तरुण नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला, पण नंतर त्याच्यासोबत आक्रित घडलं . तरुण बाहेर आला नाही म्हणून कुटुंबाने बाथरूमचा दरवाजा तोडला तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण गॅस गिझरमधून बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साइडला असल्याचं सांगितल, ज्यामुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला.
बागपतच्या सुनहेडा गावात हृदयद्रावक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. घराच्या बाथरूममधील गॅस गिझरमुळे काही मिनिटांतच अभिषेकने जीव गमावला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अभिषेक नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला. दार बंद केलं, पण बराच वेळ झाला तरी आतून कोणताही आवाज न आल्याने कुटुंब चिंतेत पडलं. त्यांनी हाक मारली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कुटुंबीयांनी दरवाजा तोडला आणि आतील दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. अभिषेक बेशुद्ध अवस्थेत पडला होता. उपचारासाठी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांच्या मते, जेव्हा गॅस गीझर चालू असतो तेव्हा त्यातून कार्बन मोनोऑक्साइड नावाचा धोकादायक वायू तयार होतो, जो दिसत नाही आणि वासही येत नाही नसतो. मात्र, तो फुफ्फुसातील ऑक्सिजन वेगाने कमी करतो.
डॉक्टरांचे म्हणणं आहे की, बंद बाथरूममध्ये गॅस गीझर सुरू ठेवणं अत्यंत धोकादायक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की, गॅस गीझरबाबत थोडासाही निष्काळजीपणा देखील प्राणघातक ठरू शकतो. सीएचसीचे अधीक्षक ताहिर बेग यांनी सांगितलं की, आंघोळ करताना गिझरमुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.