आश्वासन पूर्ततेसाठी केजरीवाल सरसावले, दहा सूत्री अजेंडा राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:27 AM2020-02-19T06:27:13+5:302020-02-19T06:28:12+5:30

दहा सूत्री अजेंडा राबविणार : 'गॅरंटी कार्ड'च्या अंमलबजावणीचे अधिकाऱ्यांना निर्देश

To fulfill the assurance, Kejriwal will move, implement a ten-point agenda | आश्वासन पूर्ततेसाठी केजरीवाल सरसावले, दहा सूत्री अजेंडा राबविणार

आश्वासन पूर्ततेसाठी केजरीवाल सरसावले, दहा सूत्री अजेंडा राबविणार

googlenewsNext

नवी दिल्ली : निवणुकीपूर्वी दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरूवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरॉथॉन बैठक करून आपने दिलेल्या दहा सूत्री अजेंडा राबविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे निर्देश अधिकाºयांना दिले आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेत निवडणुकीवेळी जाहिनाम्यातून घोषित केलेल्या मुख्य दहा 'गँरटी कार्ड' योजनांच्या अंमलबजावणीविषयी चर्चा केली. यात कचरा मुक्त दिल्ली, अनाधिकृत वसाहतीत पायाभूत सुविधा, अखंडपणे वीजपुरवठा आदीच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रत्येक मुलांला चांगल्या दर्जाचे शिक्षण, शहराच्या विविध भागातील नागरिकांसाठी मोफत बसची सुविधा, आरोगयसेवा, महिलांच्या सुरक्षा, यमुनेची स्वच्छता या विषयांवरही चर्चेसाठीही स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर केजरीवालांनी पहिल्यांदाच वेगवेगळ्या विभागातील अधिकाºयांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया बैठकीला सचिव व मुख्य सचिवांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते. याबरोबराच 'आप'ने निवडणुकी दररम्यान केलेल्या गॅरंटी कार्डची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करणे व मेट्रोच्या नेटवर्कचा विस्तार करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बसची संख्या ११ हजार होणार
शहरामध्ये सार्वजनिक वाहतूकसुविधा सुरळीत चालू ठेवण्यात बसेसचा वाटा मोठा आहे. मात्र ही वाहतूक सुविधा आधिक गतिमान करण्यासाठी व बसची खरेदी केली जाणार आहे.

च्यासाठी वेळ लागला मात्र, आम्ही सर्वप्रकारच्या अडचणी दूर केल्या व बसेस यायला सुरूवात झाली आहे. मी सर्व दिल्लीकरांना आश्वस्त करतो की बसची संख्या कमी पडणार नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या बसेसची सुविधा लवकरच मिळेल.

च्सद्य: स्थितीला शहरात एकूण ६ हजार बसेस आहेत.' असल्याची माहिती टिष्ट्वटरवर दिली आहे. येत्या पाच वर्षात नागरिकांच्या सेवेत ११ हजार बसेस आणण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: To fulfill the assurance, Kejriwal will move, implement a ten-point agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.