मोफत वाय-फायमुळे आयुष्याला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:50 AM2019-08-12T04:50:13+5:302019-08-12T04:50:54+5:30

कल्याण, सिकंदराबाद, नवी दिल्ली, पाटणा आदींसह देशातील महत्त्वाच्या दहा स्थानकांतील मोफत वाय-फाय सेवेचा केवळ रेल्वे प्रवासीच नव्हे, तर अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत.

Free Wi-Fi change life | मोफत वाय-फायमुळे आयुष्याला कलाटणी

मोफत वाय-फायमुळे आयुष्याला कलाटणी

googlenewsNext

नवी दिल्ली - कल्याण, सिकंदराबाद, नवी दिल्ली, पाटणा आदींसह देशातील महत्त्वाच्या दहा स्थानकांतील मोफत वाय-फाय सेवेचा केवळ रेल्वे प्रवासीच नव्हे, तर अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या आयुष्यात जो बदल घडला त्याच्या कहाण्या रोचक आहेत.

हावडा, सेल्दाह, जुनी दिल्ली, चेन्नई, लखनौ, गोरखपूर या स्थानकांमध्येही मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहा महत्त्वाच्या स्थानकांमध्ये दर महिन्याला २.३५ कोटी लोक मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेतात. त्यांच्याकडून ८ हजार टेराबाईट डेटाचा वापर केला जातो. त्याचे प्रमाण ८० लाख चित्रपट पाहण्यासाठी लागणाऱ्या डेटाइतके आहे.

रेलटेल कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी सांगितले की, दहा रेल्वेस्थानकांवरील वाय-फाय सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये दररोज किमान वीस हजार लोक असे असतात की इंटरनेटचे नवे वापरकर्ते आहेत. रेल्वेस्थानकांवरील वाय-फाय सेवेचा वापर करून लोक कोणत्या साईट बघतात याचा मागोवा रेलटेल कॉर्पोरेशन घेत नाही.

मुंबई, कोलकाता, दिल्ली यासारख्या प्रथम श्रेणीच्या रेल्वेस्थानकांत मोफत वाय-फायचा वापर करणाºयांची संख्या सर्वाधिक आहे.
२०१६ साली या स्थानकांत ही सेवा उपलब्ध झाली. मे महिन्यात एकट्या हावडा रेल्वेस्थानकात मोफत वाय-फाय सेवेचा ४ लाख ९० हजार लोकांनी लाभ घेतला.

रेल्वे हमाल झाला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण

रेलटेलने दिलेल्या मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेऊन एका रेल्वे हमालाने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. केरळ लोकसेवा आयोगाच्या एका परीक्षेत तो उत्तीर्ण झाला.

एक महिला रिक्षाचालक आपल्या मुलाला गृहपाठात मदत करण्यासाठी रेल्वेस्थानकावरील वाय-फायचा वापर करून इंटरनेटवर विविध विषयांची माहिती वाचून काढत असे.

बरेली स्थानकातील कॅफेटेरियाचा व्यवस्थापक कोणती रेल्वेगाडी त्या स्थानकात कधी येणार आहे याची माहिती वाय-फायसेवेद्वारे मिळवतो. कोणत्या वेळेस आपल्याकडे ग्राहकांची गर्दी होईल हे त्याला जाणून घ्यायचे असते.

Web Title: Free Wi-Fi change life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.