सलग चौथ्या दिवशी देशात पेट्रोल, डिझेल महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:47 AM2020-01-06T04:47:21+5:302020-01-06T04:47:36+5:30

नवी दिल्ली : इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डस्चे जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार मारल्यानंतर खनिज तेलसंपन्न पश्चिम आशियात युद्ध भडकण्याची ...

For the fourth time in a row, petrol, diesel prices have increased in the country | सलग चौथ्या दिवशी देशात पेट्रोल, डिझेल महागले

सलग चौथ्या दिवशी देशात पेट्रोल, डिझेल महागले

Next

नवी दिल्ली : इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डस्चे जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार मारल्यानंतर खनिज तेलसंपन्न पश्चिम आशियात युद्ध भडकण्याची भीती बळावल्याने रविवारी सलग चौथ्या दिवशीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या अधिसूचनेनंतर पेट्रोलचा किरकोळ भाव प्रतिलिटर ९ पैशांनी आणि डिझेलचा भाव प्रतिलिटर ११ पैशांनी वाढला.
दिल्लीत आजघडीला पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ७५ रुपये ५४ पैसे असून, हा वर्षातील उच्चांक आहे. दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ६८ रुपये ५१ पैसे आहे.
जनरल कासीम सुलेमानी अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेल्यानंतर जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाचा भाव या घटनेनंतर तीन टक्क्यांनी वधारला आहे. इराणने अमेरिकेवर प्रतिहल्ला केल्यास चालू तिमाहीत कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल ७८ डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पेट्रोलचा भाव पुन्हा एकदा प्रतिलिटर ९० रुपये होऊ शकतो.
>इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांचे पार्थिव अहवाज शहरातून एका ट्रकमधून नेण्यात आले, तेव्हा हजारो नागरिक जमले होते.
>इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीत मुस्लिम समुदायाने निदर्शने केली.

Web Title: For the fourth time in a row, petrol, diesel prices have increased in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.