Four Naxalites killed in Chhattisgarh, big sucess fot security forces | छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलांना मोठे यश 
छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलांना मोठे यश 

रायपूर (छत्तीसगड) - सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. आज छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चाक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून, मृत नक्षलवाद्यांकडून तास शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. 
आज सकाळच्या सुमारास धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले.  


Web Title: Four Naxalites killed in Chhattisgarh, big sucess fot security forces
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.