चार ‘अ‍ॅपाचे’ हेलिकॉप्टर वेळेआधीच भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:15 AM2019-07-28T01:15:16+5:302019-07-28T01:15:39+5:30

कंपनीने ठरल्यावेळेआधीच हेलिकॉप्टर पुरविले आहेत.

 Four 'Apache' helicopters arrive in India ahead of time | चार ‘अ‍ॅपाचे’ हेलिकॉप्टर वेळेआधीच भारतात

चार ‘अ‍ॅपाचे’ हेलिकॉप्टर वेळेआधीच भारतात

Next

नवी दिल्ली : हवाई दलासाठी अमेरिकेच्या बोर्इंग कंपनीकडून खरेदी करण्यात येणाऱ्या एकूण २२ पैकी पहिले चार ‘अ‍ॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर शनिवारी भारतात दाखल झाले. कंपनीने ठरल्यावेळेआधीच हेलिकॉप्टर पुरविले आहेत.
बोर्इंग कंपनीने ही माहिती देताना सांगितले की, ‘एएच ६४-ई’ या मॉडेलची ही चार हेलिकॉप्टर्स दिल्लीजवळच्या हिंदन हवाईतळावर पोहोचली. पुढील आठवड्यात आणखी चार हेलिकॉप्टर्सची आणखी एक खेप येईल. नंतर आठही हेलिकॉप्टर्स पठाणकोट हवाईतळावर नेऊन तेथे भारतीय हवाईदलाकडे औपचारिकपणे सुपूर्द केली जातील.
अनेक प्रकारच्या लढाऊ क्षमता असलेले ‘अ‍ॅपाचे’ हे जगात सध्या वापरले जाणारे सर्वात प्रगत हेलिकॉप्टर मानले जाते. अमेरिकेच्या हवाईदलातही प्रामुख्याने हच्ो हेलिकॉप्टर वापरले जातात. हवाईदलासाठी अशी एकूण २२ हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार बोर्इंग कंपनी व अमेरिका सरकारशी सप्टेंबर २०१५ मध्ये करण्यात आला होता. भारतीय हवाईदलात यामुळे आक्रमक लढाऊ हेलिकॉप्टरचा पहिलाच ताफा उपलब्ध होईल. हा संपूर्ण ताफा पुढील वर्षापर्यंत कार्यरत होईल.
गेल्या जुलैमध्ये हवाईदलाने या हेलिकॉप्टरच्या यशस्वी चाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर हवाईदलातील वैमानिकांची तुकडी प्रशिक्षणासाठी अमेरिकेलाही पाठविण्यात आली. भारताला देण्यात येत असलेले हेलिकॉप्टर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण व म्हणूनच जगातील सर्वोत्तम आहेत, असेही बोर्इंग कंपनीने म्हटले.

मोठी बळकटी मिळेल
हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हेलिकॉप्टरमुळे हवाई दलाच्या मारकक्षमतेला बळकटी मिळेल. भविष्यातील गरजा व आव्हाने लक्षात घेऊन हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणूनच ती खरेदी करण्यात येत आहेत.
याखेरीज ४,११८ कोटी रुपये खर्च करून अशीच सहा हेलिकॉप्टर्स भारतीय लष्करासाठी खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने याआधीच मंजुरी दिली आहे.

Web Title:  Four 'Apache' helicopters arrive in India ahead of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.