भाजपाच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाकडून मारहाण, कान पकडून मागायला लावली माफी

By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 07:29 PM2021-01-10T19:29:14+5:302021-01-10T19:32:26+5:30

Former BJP MLA molestation of Girl Update : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये भाजपाच्या एका माजी आमदारावर छेडछाडीचा आरोप करत जमावाने त्याला मारहाण केली. तसेच कान धरून माफी मागायला लावली.

Former BJP MLA molestation of Girl, beats up by mob, holds ear and apologizes | भाजपाच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाकडून मारहाण, कान पकडून मागायला लावली माफी

भाजपाच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाकडून मारहाण, कान पकडून मागायला लावली माफी

Next
ठळक मुद्देभाजपाचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने छेड काढल्याचा आणि अश्लील वर्तन केल्याचा केला आरोपपीडित तरुणीने केलेल्या आरोपांची माहिती मिळाल्यानंतर तिचे नातेवाईक झाले संतप्त त्यांनी कॉलेजमध्ये धडक देत भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांना मारहाण केली. तसेच या घटनेचा व्हिडीओ तयार केला

वाराणसी - गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचारांमुळे उत्तर प्रदेशचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, आता राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाच्याच एका नेत्याने छेडछाड केल्याचा आरोप झाला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्येभाजपाच्या एका माजी आमदारावर छेडछाडीचा आरोप करत जमावाने त्याला मारहाण केली. तसेच कान धरून माफी मागायला लावली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना वाराणसीमधील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगतुआ गावातील आहे. तिथे एका इंटर कॉलेजचे चेअरमन असलेले भाजपाचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने छेड काढल्याचा आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला.
पीडित तरुणीने केलेल्या आरोपांची माहिती मिळाल्यानंतर तिचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी कॉलेजमध्ये धडक देत भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांना मारहाण केली. तसेच या घटनेचा व्हिडीओ तयार केला. आता वाराणसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माया शंकर पाठक हे एकेकाळी वाराणसीमधून भाजपाचे आमदार होते. आता ते एमपी इन्स्टिट्युट अँड कॉम्प्युटर कॉलेज या नावाने शिक्षणसंस्था चालवतात. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांनी पीडित विद्यार्थिनीला ऑफीसमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर पीडितेने घरी जाऊन ही घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी संस्थेत येऊन मायाशंकर पाठक यांची पिटाई केली. सुरुवातीला त्यांना ऑफिसमध्ये मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना मैदानात आणून खुर्चीवर बसवून मारहाण केली. यादरम्यान, भाजपा आमदार वारंवार आपल्या चुकीसाठी कान धरून माफी मागताना दिसत होते.

मात्र दोन्ही पक्षांकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे या प्रकाराची पोलिसांनी स्वत: दखल घेत याचा तपास सुरू केला आहे. मायाशंकर पाठक १९९१ मध्ये वाराणसीमधील चिरईगांव विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटीवर विजय मिळवला होता.

Web Title: Former BJP MLA molestation of Girl, beats up by mob, holds ear and apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.