Aadhaar PVC Card: कोट्यवधी आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमचं कार्ड वैध आहे का? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 03:43 PM2022-01-19T15:43:54+5:302022-01-19T15:44:13+5:30

जर ग्राहकांना पीवीसी अथवा प्लास्टिक आधार्ड कार्ड बनवायचं असेल तर त्यासाठी ५० रुपये देऊन यूआयडीएआयच्या पोर्टलवरुन ऑर्डर करु शकतात.

For Security Reason UIDAI discourage the use of PVC Aadhaar copies from the open market | Aadhaar PVC Card: कोट्यवधी आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमचं कार्ड वैध आहे का? पाहा

Aadhaar PVC Card: कोट्यवधी आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमचं कार्ड वैध आहे का? पाहा

Next

नवी दिल्ली – आधार कार्डबाबत यूआयडीएआय(UIDAI) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खुल्या बाजारात प्रिंट होणाऱ्या पीवीसी आधार कॉपीच्या वापराला यूआयडीएआयनं विरोध केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पीवीसी कार्डमध्ये कुठलेही फिचर्स नसतात. त्यामुळे बाजारात प्रिंट केलेले आधार कार्ड कॉपी वापरु नये. पीवीसी आधार कार्ड हवं असल्यास ५० रुपये देऊन सरकारी एजेन्सीकडे ऑर्डर करु शकतात असं सांगण्यात आलं आहे.

यूआयडीएआयनं ट्विटमध्ये सांगितले आहे की, पीवीसी कार्ड अथवा प्लास्टिक आधार कार्ड खुल्या बाजारातून बनवून घेत असाल तर ते मान्य नाही. कुठल्याही आधार कार्डपासून ग्राहक काम करु शकतात. Uidai.gov.in मधून आधार कार्ड डाऊनलोड केले अथवा पीवीसी कार्ड यूआयडीएआयकडून जारी करण्यात आले तर त्याचा वापर आधार कार्डसंबंधित कामासाठी केला जाऊ शकतो.

सुरक्षेचा हवाला देत यूआयडीएआयनं खुल्या बाजारातून प्रिंट केलेल्या आधार कार्डला परवानगी नाकारली आहे. जर ग्राहकांना पीवीसी अथवा प्लास्टिक आधार्ड कार्ड बनवायचं असेल तर त्यासाठी ५० रुपये देऊन यूआयडीएआयच्या पोर्टलवरुन ऑर्डर करु शकतात. काही दिवसांत हे आधार कार्ड बनून तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल. सध्या बहुतांश लोक आधार कार्ड बनवण्यासाठी अर्ज दिल्यानंतर काही दिवसांत यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करतात. ही एक पीडीएफ कॉपी असते. जी फोन किंवा कॅम्प्युटरमध्ये सेव्ह केली जाऊ शकते. परंतु लोकं ही कॉपी घेऊन जात दुकानात लॅमिनेशन करतात किंवा काही पैसे देऊन प्लास्टिक कार्ड बनवलं जातं. मात्र त्या कार्डमध्ये सिक्युरिटी फिचर नसतं. त्यामुळे आधार कार्डच्या सुरक्षेचा मुद्दा उभा राहू शकतो.

त्यासाठी यूआयडीएआयनं त्यांच्याकडूनच स्मार्ट कार्ड बनवण्याचा सल्ला दिला आहे. खुल्या बाजारातून आधार कार्ड बनवून घेत असाल तर तुमची माहिती लीक होण्याची शक्यता असते. स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी दुकानदार पीडीएफ कॉपी घेतो. त्याआधारे हे कार्ड बनवलं जातं. अशावेळी दुसऱ्या सिस्टममध्ये आधार कार्ड सेवा सुरक्षित असणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे यूआयडीएआयनं लोकांना सल्ला दिला आहे.

Web Title: For Security Reason UIDAI discourage the use of PVC Aadhaar copies from the open market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.