Kathua Case Verdict Update: कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी 7 पैकी 6 आरोपी दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 11:59 AM2019-06-10T11:59:13+5:302019-06-10T11:59:27+5:30

जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.

Five persons convicted by Pathankot court in Kathua rape & murder case | Kathua Case Verdict Update: कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी 7 पैकी 6 आरोपी दोषी

Kathua Case Verdict Update: कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी 7 पैकी 6 आरोपी दोषी

Next

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पठाणकोट न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गावचा प्रमुख संजी राम, दोन पोलीस ऑफिसर दीपक खुजारिया आणि सुरेंद्र वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल टिळक राज यांना पठाणकोट न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. 

कठुआ येथील एका 8 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. एका बालिकेचे आठ वर्षे वयाच्या 10 जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.



सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर त्या मुलीची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. त्यानंतर मेरठमधून विशालला अटक करण्यात आली.
आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्स्टेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारावर अनेक कलम लावण्यात आली आहेत. या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली होती. 

Web Title: Five persons convicted by Pathankot court in Kathua rape & murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.