५२३ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्ण सगळ्यात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:30 AM2021-11-16T06:30:25+5:302021-11-16T06:31:00+5:30

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येत ०.३९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२६ टक्के आहे.

For the first time after 523 days, the number of patients under treatment is the lowest | ५२३ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्ण सगळ्यात कमी

५२३ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्ण सगळ्यात कमी

Next
ठळक मुद्देउपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येत ०.३९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२६ टक्के आहे.

नवी दिल्ली : देशात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १०,२२९ रुग्ण आढळले, तर १२५ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,६३,६५५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या १,३४,०९६ असून, ती गेल्या ५२३ दिवसांतील सगळ्यात कमी आहे. गेल्या ३८ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ही २० हजारांच्या आत आहे. 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येत ०.३९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२६ टक्के आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत १,८२२ ने घट झाली. देशव्यापी मोहिमेत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आतापर्यंत ११२.३४ कोटी लस मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

Web Title: For the first time after 523 days, the number of patients under treatment is the lowest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.