पाटना : बिहारची राजधानी पाटन्यामध्ये दीदारगंज भागात एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग किती रौद्र आणि भयानक आहे याचा फोटो पाहूनच अंदाज येऊ शकतो. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. अद्याप जीवितहाणीबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही.
दीदारगंज भागातील या स्क्रॅप गोडाऊनला ही भीषण आग शनिवारी सकाळी लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेल्याने यश आले नाही. यानंतर लगेचच फायर ब्रिगेडला याची माहिती देण्यात आली.
फायर ब्रिगेडचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर निय़ंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. आग कशी लागली याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. परंतू स्फोटक सदृष्य वस्तूमुळे आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: fire broke out at a scrap godown in patna, bihar; see the photo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.