फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:53 PM2019-09-04T18:53:43+5:302019-09-04T18:55:54+5:30

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले

Fire breaks out at the fireworks factory; 18 died and 20 were injured | फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी  

फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी  

googlenewsNext
ठळक मुद्दे बाटला परिसरातील फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. ५० हुन अधिक कामगारांचा पत्ता लागला नसल्याची माहिती मिळत आहे.या आगीत 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले असल्याने परिसरात हाहाकार मजला आहे.

पंजाब - गुरदासपूर येथील बाटला परिसरातील फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले असल्याने परिसरात हाहाकार मजला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळाले नसून काही वेळापूर्वी गुरुदासपूरचे उपविभागीय दंडाधिकारी दीपक भाटिया यांनी या आगीत १६ जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाले असल्याची माहिती दिली आहे. मात्र, मृतांची आणि जखमींची संख्या वाढली असून ५० हुन अधिक कामगारांचा पत्ता लागला नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title: Fire breaks out at the fireworks factory; 18 died and 20 were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.