"शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 11:42 AM2021-03-28T11:42:07+5:302021-03-28T11:51:16+5:30

Farmers Protest And Narendra Singh Tomar : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

Farmers Protest centre ready to talk with farmers says narendra singh tomar over farmers protest | "शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार"

"शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार"

Next

नवी दिल्ली - केंदाच्या कृषी कायद्यांविरोधात (New Farm Law) गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत जवळपास अकरा वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जवळपास 45 तास चर्चा झाली. मात्र अनेक प्रयत्न करुनही हा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही. शेतकरी आणि सरकारमध्ये सहमत न झाल्यानं हा मुद्दा अजूनही सोडवला गेलेला नाही. अशात आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियरमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकऱ्यांमधील गतिरोधक हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा सोडवण्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन करताना ते म्हणाले, सरकार हा मुद्दा सोडवण्यासाठी मार्ग काढेल. केंद्र चर्चा करण्यासाठी तयार आहे आणि हा मुद्दा सरकारला सोडवायचा आहे.

हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab)आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सह काही राज्यांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून आंदोलन करत कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. हे शेतकरी तीनही कृषी कायदे (New Farm Law 2020) रद्द करण्याची मागणी करत आहेत. शेतकरी संघटना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकरी विरोधी असल्याचं सांगत आहेत, तर MSP आणि APMC बाबत लिखीत आश्वासन मागत आहेत. या मुद्द्यावर शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वतः MSP होती, MSP आहे आणि MSP राहिल असं आश्वासन दिलं आहे. मात्र, यानंतरही शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंच आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (26 मार्च) शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाकही दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतप्त शेतकऱ्यांकडून भाजपा आमदाराला बेदम मारहाण; कपडे फाडले, शाई फेकली अन् तोंडाला फासलं काळं

गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा (BJP) आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग (Arun Narang) यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढलं. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत. 

Web Title: Farmers Protest centre ready to talk with farmers says narendra singh tomar over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.