लॉकडाउनमध्ये सुरू केली SBIची बनावट शाखा, तिघांना अटक; अशी झाली पोल-खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 06:55 PM2020-07-11T18:55:36+5:302020-07-11T19:02:24+5:30

एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचसंदर्भात नॉर्थ बाजार ब्रँचमध्ये चौकशी केली. त्याने या बनावट ब्रँचची दिलेली एक पावती नॉर्थ बाजार ब्रँचच्या मॅनेजरला दाखवली. तेव्हा ते  थक्क झाले. यानंतर जेव्हा ते या बनावट बंकेत पोहोचले, तेव्हा बँक पाहून ते हैराण झाले.

Fake SBI branch busted in Tamil Nadu three arrested | लॉकडाउनमध्ये सुरू केली SBIची बनावट शाखा, तिघांना अटक; अशी झाली पोल-खोल

लॉकडाउनमध्ये सुरू केली SBIची बनावट शाखा, तिघांना अटक; अशी झाली पोल-खोल

Next
ठळक मुद्देस्टेट बँकेच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय मुलाने स्टेट बँकेची ही बनावट शाखा सुरू केली होती. ही बनावट बँक हुबेहूब स्टेट बँके प्रमाणेच तयार करण्यात आली होती. ग्राहकांनी चौकशी केल्यानंतर पोल खोल

चेन्नै/कडलोर - तामिळनाडूतील कडलोर जिल्ह्यात पनरुत्ती येथे बनावट बँकेचे प्रकरण उगडकीस आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. स्टेट बँकेच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय मुलाने स्टेट बँकेची ही बनावट शाखा सुरू केली होती. स्टेट बँकेचे खरे ब्रँच मॅनेजर जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा ते बँकेचा सेटअप पाहून थक्क झाले. कारण ही बनावट बँक हुबेहूब स्टेट बँके प्रमाणेच तयार करण्यात आली होती. 

एसबीआयच्या एका माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबू याने या बनावट बँकेत कंप्यूटर, लॉकर, बनावट कागद आणि इतर काही गोष्टी ठेऊन हुबेहूब बँकेसारखेच बनले होते. एवढेच नाही, तर पनरुत्ती बाजार ब्रँच नावाने एक वेबसाईटदेखील तयार करण्यात आली होती. पोलिसांनी कमलसह ए कुमार (42) आणि एम मणिकम यांनाही अटक केली आहे. या लाकंनी लॉकडाउनदरम्यान एप्रिल महिन्यातच ही ब्रांच तयार केली होती.

ग्राहकांनी चौकशी केल्यानंतर पोल खोल - 
एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचसंदर्भात नॉर्थ बाजार ब्रँचमध्ये चौकशी केली. एकाने या बनावट ब्रँचची दिलेली एक पावती नॉर्थ बाजार ब्रँचच्या मॅनेजरला दाखवली. तेव्हा ते  थक्क झाले. यानंतर जेव्हा ते या बनावट बंकेत पोहोचले, तेव्हा बँक पाहून ते हैराण झाले. कारण ही बँक हुबेहूब खऱ्या बँकेसारखीच दिसत होती. यानंतर या बनावट बँकेची पोल-खोल झाली. आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 473, 469, 484 आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगण्यात येते, की कमलचे वडील बँकेत कर्मचारी होती. त्यामुळे त्याचे सातत्याने बँकेत येणे-जाणे असल्याने, बँकेच्या कामकाजासंदर्भात त्याला पूर्ण माहिती होती. काही वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि आई निवृत्त झाली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने नोकरीसाठी अर्जही केला होता. मात्र, नोकरी मिळण्यास उशीर झाल्याने त्याने ही बनावट बँकच सुरू केली.

अद्याप फसवणुकीचा गुन्हा नाही, चौकशी सुरू -
अद्याप एकाही ग्राहकाने फसवणुकीची तक्रार केलेली नाही. तसेच कमलनेही सांगितले, की कुणाला फसवण्यासाठी त्याने बँक सुरू केली नव्हती. मात्र, त्याची आई आणि काकूच्या अकाउंटदरम्यान मोठ्या प्रमाणावर ट्रांझेक्शन झाले आहेत. यासंदर्भातही चौकशी केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

देशात लवकरच धावणार 44 नव्या 'वंदे भारत' ट्रेन, 6 कंपन्यांनी लावली बोली, एका चिनी कंपनीचाही समावेश

मोठी बातमी : 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आणखी 20 अ‍ॅप्सवर टांगती तलवार; सरकार केव्हाही घालू शकतं बंदी

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Web Title: Fake SBI branch busted in Tamil Nadu three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.