Fact Check : "लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 12:46 PM2021-10-05T12:46:27+5:302021-10-05T12:53:40+5:30

Fact Check Modi Government Will Give Free Mobile Recharge : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला तब्बल 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे असं म्हटलं आहे.

fact check modi government will give free mobile recharge as record corona vaccination pib vi jio airtel | Fact Check : "लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : "लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य'

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,346 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांसाठी विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच मोदी सरकारच्या वतीने गरजुंना, गरिबांना मदत करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

कोरोना काळात अनेकदा कधी ऑक्सिजनची कमी, तर कधी रेमडेसिविरसारख्या औषधांच्या उपलब्धतेबाबत खोटे, फेक दावे केले गेले. त्यानंतर आता देशातील कोरोना लसीकरणाबाबत खोटा दावा करण्यात आला आहेत. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज हा जोरदार व्हायरल होत असून यामध्ये देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला तब्बल 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे असं म्हटलं आहे. मात्र आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे.

WhatsApp मेसेजमध्ये सरकार एयरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) युजर्सना तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्याच्या दाव्याची प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळेच PIB ने हा दावा पूर्णपणे खोटा आणि आधारहीन असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही युजरने या दाव्याच्या जाळ्यात अडकू नये असं देखील PIB कडून सांगण्यात आलं आहे.

खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न

कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: fact check modi government will give free mobile recharge as record corona vaccination pib vi jio airtel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.