Fact Check : 1 एप्रिलपासून खरेच रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:48 PM2021-02-13T16:48:20+5:302021-02-13T16:49:54+5:30

resumption of full passenger train services Fact Check: १ एप्रिलपासून सर्व पँसेंजर गाड्या धावण्यास सुरुवात होईल. ढील महिन्यात असलेल्या होळीमुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी असेल. त्यातच कोरोनाची सध्याची स्थिती पाहता रेल्वेसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. आता पीएमओकडून लवकरच याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे वृत्त पसरले होते.

Fact Check: Clarification about resumption of full passenger train services from 1st april | Fact Check : 1 एप्रिलपासून खरेच रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार का? जाणून घ्या...

Fact Check : 1 एप्रिलपासून खरेच रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार का? जाणून घ्या...

googlenewsNext

गतवर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर टप्प्याटप्प्याने काही विशेष मेल,एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी देशातील रेल्वेसेवा अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. यातच आज रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची बातमी आली. यामध्ये महिना आणि तारीखही देण्यात आली. परंतू ती बातमी खोटी असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (Indian Railways clarifies about resumption of full passenger train services from April)


पूर्ण क्षमतेने प्रवासी रेल्वे सेवा एप्रिलमध्ये सुरु करण्यात येणार आहे, अशी बातमी आली आहे. ही बातमी खोटी आहे. अद्याप अशा प्रकारची कोणतीही तारीख ठरविण्यात आलेली नाही. रेल्वे टप्प्या टप्प्याने रेल्वे सेवांची संख्या वाढवत आहे. सध्या 65 टक्क्यांहून अधिक रेल्वे धावत आहेत. तर 250 रेल्वे सेवा एकट्या जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हळूहळू आणखी वाढ करण्यात येणार आहे. 
यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अपवांना बळी पडू नये. अशाप्रकारचे निर्णय जेव्हा घेतले जातील तेव्हा अधिक़ृतरित्या सर्वांना कळविले जाईल, असेही रेल्वेने म्हटले आहे. 


१ एप्रिलपासून सर्व पँसेंजर गाड्या धावण्यास सुरुवात होईल अशी अफवा उठली होती. यामध्ये सामान्य, शताब्दी आणि राजधानीसह सर्व प्रकारच्या रेल्वेगाड्यांचा समावेश असेल. पुढील महिन्यात असलेल्या होळीमुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी असेल. त्यातच कोरोनाची सध्याची स्थिती पाहता रेल्वेसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. आता पीएमओकडून लवकरच याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असेही यामध्ये म्हटले होते. परंतू ते सारे खोटे आहे. 

Web Title: Fact Check: Clarification about resumption of full passenger train services from 1st april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.