हयात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:08 AM2021-12-03T09:08:48+5:302021-12-03T09:09:10+5:30

निवृत्तीवेतन सुरू राहावे, यासाठी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढविली आहे.  यंदा निवृत्ती वेतनधारकांना त्यासाठी वाढीव ३० दिवस मिळाले आहेत.

Extension for survival certificate | हयात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

हयात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

Next

नवी दिल्ली : निवृत्तीवेतन सुरू राहावे, यासाठी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढविली आहे.  यंदा निवृत्ती वेतनधारकांना त्यासाठी वाढीव ३० दिवस मिळाले आहेत.
निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने मुदत १ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. ज्येष्ठांना कोरोना विषाणूपासून असलेला धोका लक्षात घेऊन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. 

व्हिडिओ सुविधेद्वारे सादर  करता येणार हयात प्रमाणपत्र
- निवृत्ती वेतनधारकांना आता पोस्ट कार्यालयामधूनही प्रमाणपत्र मिळू शकते. टपाल खात्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिसात जाऊन त्यांना हे प्रमाणपत्र आणता येईल. ‘जीवन प्रमाण’ने डिजिटल हयात प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
-  प्रमाणपत्र घरबसल्या सादर करता यावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने व्हिडिओ सेवा सुरू केली आहे. या  सेवेला बँकेने ‘व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सर्व्हिस’ असे नाव दिले आहे.

Web Title: Extension for survival certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.