नव्वद वर्षीय कैद्यावर हॉस्पिटलमध्ये पायात बेड्या टाकून उपचार, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:07 PM2021-05-13T16:07:25+5:302021-05-13T16:09:25+5:30

असे सांगितले जात आहे की, ९० वर्षीय बाबूराम सिंह एका जुन्या केसमध्ये तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. बुधवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होत.

Etah 90 year old tied to bed in hospital | नव्वद वर्षीय कैद्यावर हॉस्पिटलमध्ये पायात बेड्या टाकून उपचार, कारण....

नव्वद वर्षीय कैद्यावर हॉस्पिटलमध्ये पायात बेड्या टाकून उपचार, कारण....

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं असून लोकांची स्थिती किती वाईट झाली आहे याचे फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. अशाच एका रूग्णाचा फोटो व्हायरल झाला आहे. यूपीच्या जनपद एटामध्ये ९० वर्षीय कैद्यावर पायात बेड्या टाकून उपचार सुरू आहेत. 

असे सांगितले जात आहे की, ९० वर्षीय बाबूराम सिंह एका जुन्या केसमध्ये तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. बुधवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होत. त्यामुळे त्यांना महिला हॉस्पिटलच्या नॉन कोविड वार्डात दाखल करण्यात आलं.

महिला हॉस्पिटलमद्ये ड्युटीवर तैनात डॉक्टर सौरभ यांनी सांगितले की बाबूराम यांना थोडी मानसिक समस्याही आहे. त्यामुळे ते सतत बेडवरून उठून पळून जातात. त्यामुळे पळून जाताना त्यांना कुठे जखम होऊ नये म्हणून त्यांना बेड्यांमध्ये बांधून ठेवण्यात आलं आहे. 

सध्या बाबूराम यांच्या अशाप्रकारेच पायांमध्ये बेड्या बांधूनच उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानवाधिकाराबाबत कुणीही काहीही बोलायला तयार नाही. बाबूराम हे हाविवपूर येथील रहिवाशी आहेत. सध्या त्यांच्यावर महिला हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड वार्डात उपचार सुरू आहेत. एका जुन्या केसमध्ये बाबूराम हे जिल्हा तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. 
 

Web Title: Etah 90 year old tied to bed in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.