मस्क है तो मुमकीन है! भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा देण्याची तयारी; इंटरनेट तुफान वेगानं चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:19 AM2021-02-12T05:19:06+5:302021-02-12T07:17:52+5:30

मस्क यांनी टेस्लाचा प्लाण्ट बंगळुरूत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ते भारतात मोबाइल इंटरनेट सेवा क्षेत्रातही पाय रोवू इच्छितात.

Elon Musks Starlink satellite internet service coming to India soon | मस्क है तो मुमकीन है! भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा देण्याची तयारी; इंटरनेट तुफान वेगानं चालणार

मस्क है तो मुमकीन है! भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा देण्याची तयारी; इंटरनेट तुफान वेगानं चालणार

googlenewsNext

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध अशा टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सर्वेसर्वा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वगैरे बिरुदावली मिरवणारे एलॉन मस्क हे एक बडे प्रस्थ आहेत. मस्क यांनी टेस्लाचा प्लाण्ट बंगळुरूत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ते भारतात मोबाइल इंटरनेट सेवा क्षेत्रातही पाय रोवू इच्छितात. त्यासंदर्भात अलीकडेच मस्क यांनी केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. सॅटेलाइट बेस्ट इंटरनेट सेवा देण्याची त्यांची योजना आहे. जाणून घेऊ याबाबत...

१२१ एमबीपीएस वेगाच्या साह्याने दक्षिण कोरिया क्रमांक एकवर
८१% भारतीय ४जी वेगाचा मोबाइल वापतात. 

मस्क स्टारलिंक प्रोजेक्ट अंतर्गत भारतात सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सेवा पुरवणार
१००  एमबीपीएस (मेगाबाइट प्रति सेकंद) एवढा इंटरनेट स्पीड असेल, असा मस्क याचा दावा

हे भारतात शक्य आहे का?
पृथ्वीच्या कक्षेत भूस्थिर राहणारे उपग्रह स्पेस एक्सद्वारे अवकाशात सोडले जातात. त्याद्वारे ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा पुरविल्या जातात. जगातल्या अगदी दुर्गम भागातही उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा 
पुरविणे या प्रोजेक्टमुळे स्पेस एक्सला शक्य होते. आतापर्यंत १००० उपग्रह स्पेस एक्सने या उद्देशाने अवकाशात भूस्थिर केले आहेत. ५० ते १५० एमबीपीएस वेगाचे इंटरनेट देणे स्पेस एक्सला देणे शक्य झाले आहे. आता स्पेस एक्सला स्टारलिंक प्रोजेक्टची व्याप्ती वाढवायची असून त्यासाठी भारतात ते प्रयत्न करत आहेत.

सध्या स्पीड काय
१२.०७ एमबीपीएस भारतातील मोबाइल डाउनलोडिंगचा वेग
३५.२६ एमबीपीएस जगाचा डाउनलोडिंगचा सरासरी वेग

मोबाइल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या बड्या कंपन्या आणि त्यांचा बाजार हिस्सा
रिलायन्स जिओ ३४.७६% (सरासरी वेग : १९.३ एमबीपीएस)
भारती एअरटेल  २८.३३% (सरासरी वेग : १०.२ एमबीपीएस)
व्होडाफोन-आयडिया  २८.३३% (सरासरी वेग : १०.३ एमबीपीएस)
बीएसएनएल १०.८४% (सरासरी वेग : १०.५ एमबीपीएस)

सॅटेलाइट इंटरनेटचा फायदा काय?
जमिनीखाली ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारण्याचे टळेल.
तांत्रिक अडचणी न येता नेटसेवा मिळेल.
ग्रामीण भागातील युझर्सना अधिक सोयिस्कर ठरेल. तूर्तास त्यांना कंपन्यांच्या नेटवर्कच्या अडचणींचा सामना करावा लागतो.
इंटरनेटचा वापर वाढून त्याचा अंतिम फायदा ग्राहकांनाच होईल.
इतर कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.

Web Title: Elon Musks Starlink satellite internet service coming to India soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teslaटेस्ला