Election Commission must show their independence - Asaduddin Owaisi | ईव्हीएम नाही; हिंदूंच्या मनाचंच हॅकिंग झालंय, लोकसभा निकालांनंतर ओवेसींचं वक्तव्य
ईव्हीएम नाही; हिंदूंच्या मनाचंच हॅकिंग झालंय, लोकसभा निकालांनंतर ओवेसींचं वक्तव्य

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, एमआयएमचे नेते असदुद्दीत ओवेसी यांनी भाजपाच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार झालेली नाही तर हिंदूंच्या मनामध्येच फेरफार झाला आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे. 

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले की, ''निवडणूक आयोगाने स्वायत्त असले पाहिजे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांची 100 टक्के पडताळणी झाली पाहिजे, असे मला वाटते. मात्र निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मनामध्येच हेराफेरी गेली आहे, असे मला वाटते.   


Web Title: Election Commission must show their independence - Asaduddin Owaisi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.