UP Election 2022 : प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटरच्या नियुक्तीसाठी काँग्रेस घेतेय परीक्षा, विचारले जातायत असे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:23 PM2021-11-16T19:23:44+5:302021-11-16T19:24:11+5:30

सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता.

UP Election 2022 up congress took the examination in lucknow to appoint spokesperson and coordinator | UP Election 2022 : प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटरच्या नियुक्तीसाठी काँग्रेस घेतेय परीक्षा, विचारले जातायत असे प्रश्न

UP Election 2022 : प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटरच्या नियुक्तीसाठी काँग्रेस घेतेय परीक्षा, विचारले जातायत असे प्रश्न

Next

मिशन 2022 (UP Election 2022) च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 1-1 प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटर बनविण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस यासाठी परीक्षा आणि मुलाखतीही घेत आहे. यातच, मंगळवारी यूपी काँग्रेसने लखनऊमध्ये प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटर नियुक्त करण्यासाठी एक परीक्षा आणि मुलाखत आयोजित केली होती. यात 16 जणांनी भाग घेतला होता. यांपैकी 9 जण आधीपासूनच काँग्रेसमध्ये होते. तर 7 जणांनी आजच पक्ष कार्यालयात काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आणि नंतर परीक्षा आणि मुलाखत दिली. (Congress took the examination to appoint spokesperson and coordinator)

असा आहे प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न -
सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता. येथे लेखी उत्तरांसाठी 2 प्रश्न विचारले गेले, तर बहुपर्यायी प्रश्न 10 ऐवजी 15 होते.

काय विचारण्यात आले प्रश्न -
परीक्षा देणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत काँग्रेसच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. याशिवाय, काँग्रेस सरकारच्या कामगिरीसंदर्भात आणि उत्तर प्रदेशच्या, विशेषतः संबंधित जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून आणि भौगोलिक स्थितीसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले.

योगी सरकारच्या कामगिरीवरही विचारण्यात आले प्रश्न - 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी सरकारच्या अपयशासंदर्भातही परीक्षेत प्रश्न विचारण्यात आले. कोरोना काळासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. परीक्षेचे समन्वयक आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. उमाशंकर पांडे म्हणाले, लखनौ विभागातील सर्व जिल्ह्यांची परीक्षा 21 नोव्हेंबरला लखीमपूर जिल्ह्यासह पूर्ण होईल. यानंतर 23-24 नोव्हेंबरपर्यंत या विभागाचा निकाल घोषित केला जाईल. तसेच 15-20 दिवसांत संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याची योजना आहे.

 

Web Title: UP Election 2022 up congress took the examination in lucknow to appoint spokesperson and coordinator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.