During the voting, the women were brought out and the people were upset | मतदानादरम्यान महिलांचा बुरखा उतरवण्याचा आग्रह अन् कम्युनिस्ट नेत्यावर झाली टीका
मतदानादरम्यान महिलांचा बुरखा उतरवण्याचा आग्रह अन् कम्युनिस्ट नेत्यावर झाली टीका

थिरुअनंतपूरमः लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात केरळमधल्या 7 पोलिंग बुथवर पुनर्मतदान केलं जात आहे. खरं तर कन्नूर आणि कासरगोड लोकसभेच्या जागांसाठी या मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं या सात बूथवर मतदान रद्द केलं असून, सातव्या टप्प्यात पुन्हा त्या मतदान केंद्रांवर पुनर्मतदान होत आहे.  रविवारी होत असलेल्या या मतदानादरम्यान सीपीआय(एम)चे नेते आणि कन्नूरमधले पक्षाचे जिल्हा सचिव एम. व्ही. जयराजन यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे.

महिला बुरखा घालून मतदान करण्याचा हक्क बजावण्याचा आग्रह करू लागल्यास समजावं की त्या बोगस मतदान करू इच्छितात, असंही जयराजन म्हणाले आहेत. एका जनसभेला संबोधित करताना जयराजन म्हणाले, मतदानासाठी जेव्हा रांग लागते तेव्हा त्यांनी स्वतःचा बुरखा काढून कॅमेऱ्यासमोर यावं. कन्नूरमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येनं असल्यानं जयराजन यांच्या विधानानं वाद निर्माण झाला आहे.


या वादानंतर यू-टर्न घेत जयराजन म्हणाले, बुरखा घालून मतदान करणं खरं तर वाईट नाही. पण जर पोलिंग एजंट यांनी बुरखा उतरवण्यास सांगितल्यास तो उतरवावा, असंही ते म्हणाले आहेत. जयराजन यांच्या विधानावरून काँग्रेस पक्षानं त्यांना धारेवर धरलं आहे. जयराजन यांचं विधान मुस्लिम महिलांचा अपमान करणारं आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयुक्त मीणा म्हणाल्या, महिला बुरखा घालून मतदान करू शकतात. त्यांची ओळख पटवली जाईल. त्यासाठी एका महिला अधिकाऱ्यांचीही पोलिंग बुथवर व्यवस्था करण्यात येणार आहे. 


Web Title: During the voting, the women were brought out and the people were upset
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.