DRDO Missile Test: जमिनीवरून हवेत मारा करू शकणार; नौदलाच्या मिसाईलची चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 11:31 PM2021-12-07T23:31:05+5:302021-12-07T23:31:23+5:30

DRDO Missile Test: मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली. या मिसाईलची पहिली चाचणी 22 फेब्रुवारीला घेण्यात आली होती.

DRDO Missile Test: Able to hit in the air from the ground; Successful test of naval missile | DRDO Missile Test: जमिनीवरून हवेत मारा करू शकणार; नौदलाच्या मिसाईलची चाचणी यशस्वी

DRDO Missile Test: जमिनीवरून हवेत मारा करू शकणार; नौदलाच्या मिसाईलची चाचणी यशस्वी

Next

डीआरडीओने मंगळवारी जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी अंतराच्या मिसाईची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरून काही अंतरावरील चांदीपूरच्या लक्ष्याला अचूक भेदण्यात आले. हे मिसाईल व्हर्टिकल लाँचरद्वारे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून लाँच करण्यात आले होते. मंत्रालयाने सांगितले की, अपेक्षेप्रमाणे मिसाईलने लक्ष्य भेदले. 

हे मिसाईल भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आले आहे. मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली. या मिसाईलची पहिली चाचणी 22 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि नौदलाचे अभिनंदन केले आहे. हे मिसाईल हवाई हल्ल्यांविरोधात भारतीय नौदलाची ताकद वाढविणार आहे, असे ते म्हणाले. 



 

या मिसाईलची रेंज 50 ते 60 किमी आहे. तसेच हे मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करू शकते. म्हणजेच हवेतून येणाऱे विमान किंवा मिसाईल ते क्षणात उध्व्स्त करू शकते. हे मिसाईल नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल. या मिसाईलच्या चाचणीसाठी बालासोर जिल्हा प्रशासनाने संरक्षणासाठी 2.5 किमीच्या परिघात राहणाऱ्या 4 हजार लोकांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलविले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील अभिनंदन केले आहे.

Web Title: DRDO Missile Test: Able to hit in the air from the ground; Successful test of naval missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.