मॉब लिंचिंग विरोधातील 'त्या' पत्रातील मणिरत्नम यांची सही खोटी, टीमचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 04:58 PM2019-07-24T16:58:54+5:302019-07-24T17:01:34+5:30

मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 

director mani ratnam team deny his sign on letter filed by celebs on mob lynching to pm modi | मॉब लिंचिंग विरोधातील 'त्या' पत्रातील मणिरत्नम यांची सही खोटी, टीमचा दावा

मॉब लिंचिंग विरोधातील 'त्या' पत्रातील मणिरत्नम यांची सही खोटी, टीमचा दावा

Next

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना पुन्हा एकदा वाढल्या असून, त्यात काही जणांचा बळीही गेला आहे. देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 

या पत्रामध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली आहे. या मान्यवरांमध्ये अदूर गोपालकृष्ण, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह अनेकांची नाव असल्याचे समजते. 

दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचेही नाव आहे. मात्र, त्यांच्या टीमने याबाबचे वृत्त फेटाळले आहे. टीमच्या माहितीनुसार मणिरत्नम सध्या आगामी चित्रपटाच्या के प्री प्रोडक्शनच्या कामात व्यस्त आहे. त्यांनी अशा कोणत्याही पत्रावर सही केली नाही किंवा त्यांच्याकडे यासंदर्भातील पाठिंब्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश आहे. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे दमन न होता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे, तसेच हा देश एक प्रबळ राष्ट्र बनावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनाकरण्यात आली आहे. 

याचबरोबर, जय श्रीराम हे आज भडकवणारे वाक्य बनले आहे. श्रीराम हे बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहेत. त्यामुळे राम नामाचे राजकारण बंद करावे. देशभरात दलितांवरील अत्याचाराच्या 840 घटना घडल्या आहेत. यावर काय कारवाई झाली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 
 

Web Title: director mani ratnam team deny his sign on letter filed by celebs on mob lynching to pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.