COP26: हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आपत्तीसाठी विकसित देशांनी रोख भरपाई द्यायला हवी, भारताकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:12 AM2021-10-24T05:12:39+5:302021-10-24T05:13:17+5:30

cop26 meeting : पर्यावरण मंत्रालयाचे सचिव रामेश्वरप्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या खर्चाची भरपाई व्हायला हवी आणि ती विकसित देशांनी द्यायला हवी, अशी भारताची भूमिका आहे.

Developed countries should pay cash compensation for disasters caused by climate change, | COP26: हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आपत्तीसाठी विकसित देशांनी रोख भरपाई द्यायला हवी, भारताकडून मागणी

COP26: हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आपत्तीसाठी विकसित देशांनी रोख भरपाई द्यायला हवी, भारताकडून मागणी

Next

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आपत्तीसाठी विकसित देशांनी रोख भरपाई द्यायला हवी, अशी मागणी भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या आगामी ‘सीओपी २६ हवामान शिखर परिषदे’त केली जाणार आहे.
पर्यावरण मंत्रालयाचे सचिव रामेश्वरप्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या खर्चाची भरपाई व्हायला हवी आणि ती विकसित देशांनी द्यायला हवी, अशी भारताची भूमिका आहे. या मुद्द्यावर भारत गरीब व विकसनशील देशांसोबत आहे. स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे वार्षिक सीओपी शिखर परिषद होणार आहे. हवामान बदलाच्या बिघडलेल्या स्थितीच्या मुद्द्यावर ही बैठक निर्णायक ठरेल, असे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावर भारताने आपली भूमिका अमेरिकेचे हवामान दूत जॉन केरी यांच्याकडे आधीच स्पष्ट केली आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. जगात निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंसाठी विकसित देशच जबाबदार आहेत. 

Web Title: Developed countries should pay cash compensation for disasters caused by climate change,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app