औद्योगिक शांततेसाठी निमा संघटनेचा निर्धार
By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST
सातपूर : नाशिकला कायम औद्योगिक अशांतता असते, असे जे काही वातावरण निर्माण केले जात आहे ते दूर करण्यासाठी आणि नाशिकची प्रतिमा उंचावण्यासाठी कामगार संघटना आणि औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्णय निमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
औद्योगिक शांततेसाठी निमा संघटनेचा निर्धार
सातपूर : नाशिकला कायम औद्योगिक अशांतता असते, असे जे काही वातावरण निर्माण केले जात आहे ते दूर करण्यासाठी आणि नाशिकची प्रतिमा उंचावण्यासाठी कामगार संघटना आणि औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्णय निमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.गेल्या वीस वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नाही. शिवाय औद्योगिक अशांततेमुळे नाशिकची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भविष्यात औद्योगिक संघटना, कामगार संघटना, शहरातील लोकप्रतिनिधी, संबंधित शासकीय अधिकारी यांची समिती स्थापन करून सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका निमाच्या एचआरआयआर समितीचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी विशद केली. तर औद्योगिक संघटनांबरोबर कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यामागील भूमिका निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी विशद केली. सीटू युनियनचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी मनोगत व्यक्त करताना शहर बदनाम व्हावे, अशी भूमिका नाही. औद्योगिक समस्या सोडविण्यासाठी आणि मोठे उद्योग प्रकल्प आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, निमाचे माजी अध्यक्ष रवि वर्मा, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी, डॉ. उदय खरोटे, मनीष कोठारी, हर्षद ब्रााकर, व्हिनस वाणी, तसेच कामगार विकास मंचचे उत्तम खांडबहाले, कैलास मोरे, प्रवीण पाटील, सीताराम ठोंबरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी औद्योगिक समस्या सोडविण्यासाठी एक सर्वमान्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या माध्यमातून भविष्यात मोठे उद्योग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी मनीष रावळ, संदीप भदाणे, एस. वाय. भावसार, भिवाजी भावळे, नंदू गायकवाड आदिंसह कामगार संघटनांचे पदाधिकार उपस्थित होते. निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी आभार मानले.फोटो - निमात आयोजित बैठकीत बोलताना कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव. समवेत मनीष कोठारी, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, संजीव नारंग, डॉ. डी. एल. कराड, मंगेश पाटणकर, मोहन पाटील, उत्तम खांडबहाले आदि.