बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:22 IST2025-05-20T09:20:34+5:302025-05-20T09:22:16+5:30

महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह दमण-दीव येथूनही येथे दारू येते.  हरयाणा, पंजाब, दिल्ली, गोवा येथून पार्सलद्वारे महागडी दारू येते. सीमावर्ती भागात दारू सर्वाधिक किमतीला विकली जाते.  

Despite the ban, there is a flood of liquor in Gujarat; Where is liquor worth Rs 15,000 crores coming from every year? | बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?

बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?

सुरत : गुजरातमध्येदारूबंदी असूनही, दरवर्षी १२ ते १५ हजार कोटी रुपयांच्या दारूची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. पोलिस ३००-५०० कोटी रुपयांची दारू जप्त करतात, परंतु माफिया, भ्रष्ट पोलिस,  भ्रष्ट राजकारण्यांच्या संगनमताने तीन ते चार पट जास्त नफा मिळवून बेकायदा दारू व्यवसाय सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह दमण-दीव येथूनही येथे दारू येते.  हरयाणा, पंजाब, दिल्ली, गोवा येथून पार्सलद्वारे महागडी दारू येते. सीमावर्ती भागात दारू सर्वाधिक किमतीला विकली जाते.  

तस्करीचे प्रमुख मार्ग? 
रतनपूर, अबू रोड, मंडार, सांचोर सारख्या सीमावर्ती मार्गांवरून लहान आणि मध्यम वाहनांद्वारे गुजरातच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दारू आणली जाते. जिथून माफिया ती अहमदाबाद आणि राज्याच्या इतर भागात पोहोचवतात. 

तस्करीचे प्रमुख मार्ग? 
रतनपूर, अबू रोड, मंडार, सांचोर सारख्या सीमावर्ती मार्गांवरून लहान आणि मध्यम वाहनांद्वारे गुजरातच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दारू आणली जाते. जिथून माफिया ती अहमदाबाद आणि राज्याच्या इतर भागात पोहोचवतात. 

दारू तस्करीच्या मोठ्या घटना
१४४ कोटी रुपयांच्या ८२ लाख विदेशी दारूच्या बाटल्या जप्त
११.४७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.
६.५८ कोटी रुपयांची दारू जानेवारी फेब्रुवारीत जप्त करण्यात आली. 

येथे कशी पोहोचते दारू? 
महाराष्ट्राच्या नाशिक, पालघर आणि नवापूर येथून येणारी दारू नवापूर, भिलाड आणि सापुतारा मार्गे दक्षिण गुजरातमध्ये नेली जाते.
पोलिसांना कसा चकवा?
तस्करी केलेल्या वाहनांसोबत एस्कॉर्ट वाहने असतात जेणेकरून कोणताही धोका आढळल्यास मार्ग बदलता येईल.
जुनी किंवा चोरीची वाहने वापरली जातात, जी हस्तांतरित केली जात नाहीत.
तरुणांना दारूने भरलेली वाहने देतात. 

Web Title: Despite the ban, there is a flood of liquor in Gujarat; Where is liquor worth Rs 15,000 crores coming from every year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.