मंदिर, मठांवरील सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी; आता मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 07:23 AM2021-11-24T07:23:29+5:302021-11-24T07:25:14+5:30

साधूंनी हे स्पष्ट म्हटले की, जर शेतकरी सरकारला वाकवू शकतात तर आम्ही का नाही? गरज भासल्यास आम्ही दिल्लीत मुक्कामी राहू.

Demand for removal of government control over temples and monasteries | मंदिर, मठांवरील सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी; आता मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात

मंदिर, मठांवरील सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी; आता मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात

Next

नवी दिल्ली : कृषी कायदे मागे घेतले गेल्यामुळे कामगार संघटनांपासून  ते साधू-संतांपर्यंत अनेकांना आपापल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी आहे, असे वाटत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले साधू आणि संतांनी येथील कालकाजी मंदिरात मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन मंदिर आणि मठांवरील सरकारी नियंत्रण काढून टाकण्याच्या मागणीसाठी आहे. 

साधूंनी हे स्पष्ट म्हटले की, जर शेतकरी सरकारला वाकवू शकतात तर आम्ही का नाही? गरज भासल्यास आम्ही दिल्लीत मुक्कामी राहू. अखिल भारतीय संत समितीच्या कार्यक्रमात साधू-संतांनी जर शेतकरी दिल्लीचे रस्ते अडवून बसू शकतात आणि सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात, तर आम्ही तसे का करू शकणार नाही, असे म्हटले. 

अखिल भारतीय आखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा उल्लेख करून मठ-मंदिरांवरील अवैध रुपातील ताब्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: Demand for removal of government control over temples and monasteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.